Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

Beed News : बीडमध्ये काम करताना २५ वर्षीय युवकाचा तोल जाऊन नदीपात्रात पडल्यामुळे मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On
Summary
  • पांगरी येथे मिक्सर ऑपरेटर म्हणून काम करणारा २५ वर्षीय युवक अपघाती मृत्यूमुखी

  • नदीपात्रात पडल्याने आणि पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू

  • मृत युवक विवाहित असून दोन लहान अपत्यांचा आधार हिरावला

  • परिसरात शोककळा पसरली, सुरक्षेच्या अभावावर नागरिकांनी आवाज उठवला

योगेश काशीद (बीड)

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. २५ वर्षांचा तरुण काम करत असताना तोल जाऊन नदीपात्रात पडल्यामुळे मृत्युमुखी पडला आहे. मृत युवकाचे नाव अमेर अजमेर पठाण असे असून तो परळी शहरातील बरकात नगर भागातील रहिवासी होता. या घटनेने गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

अमेर पठाण हा विवाहित असून आपल्या कुटुंबासाठी तो मिक्सर ऑपरेटर म्हणून पांगरी येथे एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. काम चालू असताना अचानक त्याचा तोल गेल्याने तो नदीपात्रात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, नदीला मोठा पूर आल्याने तो वाहून गेला. त्यानंतर लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed News
Beed News: मुंडे विरुद्ध मुंडे वाद पेटला; राजकारणात खळबळ|VIDEO

अमेरचा मृतदेह परळी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर बरकात नगर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन अपत्यांचा आधार हिरावल्याने कुटुंबीयांसमोर भविष्यातील मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.

Beed News
Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

ग्रामीण भागात नदीपात्राजवळील कामांदरम्यान सुरक्षेची काळजी न घेतल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेच्या निमित्ताने कामगारांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची खबरदारी घ्यावी, कामगारांसाठी सुरक्षा साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. अमेरिक पठाणच्या निधनाने तरुणाईतही हळहळ व्यक्त होत असून, पांगरी परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com