Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

beed crime news : बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घटना घडली. या गोळीबारात तरुणी जखमी झाली आहे.
Beed news
Beed CrimeSaam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. जालन्याच्या तरुणीवर गेवराईत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. या गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. गेवराईतील या गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

Beed news
Maharashtra Politics : 'उद्धव ठाकरेंनाही निवडणूक जिंकण्यासाठी ऑफर; पवारांनंतर राऊतांनी फोडला नवा बॉम्ब, VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील शहागड येथील खामगाव परिसरातील ३० वर्षीय शितल कटमिल्ला पवार ही महिला तिच्या मैत्रीणीसह काल सायंकाळी गेवराईला खरेदीसाठी आली होती. गेवराईत आल्यानंतर तोंडाला बांधून आलेल्या दोन ते तीन जणांनी दोघींना मारहाण करायला सुरूवात केली. मारहाणीपासून बचाव करण्यासाठी दोघी तरुणी वेगवेगळ्या दिशेने पळाल्या. मात्र शितल पवार या तरुणीच्या छातीत गोळी लागल्याचे समोर आले आहे.

Beed news
Mumbai Crime : विमानतळावर परदेशी प्रवाशांची लुबाडणूक; मुंबई पोलिसांचं 'ऑपरेशन क्लीन-अप' यशस्वी, टोळी अशी अडकली जाळ्यात

शितलला शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेत बीडच्या जिल्हा रूग्णालयात आणण्यात आलं. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून एक्सरे काढण्यात आला. एक्सरेमध्ये छातीत गोळी दिसून येत आहे. सदर महिलेच्या हाता-पायावर देखील जखमा आहेत. दरम्यान, शितल पवार यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीणीने हा गोळीबार गेवराईमध्ये झाल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी गेवराई पोलिस अधिक तपास करत आहेत.

Beed news
Dadar Kabutar khana : दादर कबूतरखान्यावरून 'फडफड' सुरुच; जैन मुनींचा शस्त्र उचलण्याचा इशारा, कोर्टालाही उघड धमकी? VIDEO

परळी पुन्हा हादरली

बीडच्या परळीत व्हाइटनरची नशा करणाऱ्या मुलाने आई-वडिलांसह आजीवर चाकूने हल्ला केला. परळीमधील फुलेनगर भागात ही घटना घडली. अरबाज रमजान कुरेशी असे आरोपीचे नाव आहे. अरबाजच्य हल्ल्यात जखमी झालेल्या आजीसह आई-वडिलांवर उपचार सुरु आहेत. तरुणाच्या हल्ल्यात आजीचा उपचारादरम्यान जागीच मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी आरोपी अरबाजला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com