Dhananjay Munde's letter saam tv
महाराष्ट्र

Bogus Seeds Racket: बोगस बियाणांचं रॅकेट राज्यभरात सक्रिय, शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा; धनंजय मुंडेंचं कृषीमंत्र्यांना पत्र

Dhananjay Munde's Letter On Bogus Seeds Racket Active in State: दुकानदार 850 रुपयांची कापसाची बॅग 2000 हजाराला विकतात अशी तक्रारही धनंजंय मुंडे यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dhananjay Munde's letter to Agriculture Minister: खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात काही क्षेत्रात पाऊस झाला तर काही क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी वर्गात सोयाबीन, कपाशी यासह विविध बियाणे खरेदी करण्याबाबत लगबग सुरू आहे.

याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली माहिती

धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले की, एक जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात छत्रपती संभाजी नगर येथील एका नामांकित कंपनीच्या नावाचे बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केले होते. त्यांची किंमत दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

याच प्रकारचे बोगस बियाण्यांचे रॅकेट राज्यभरात सर्वत्र सक्रिय झालेले आहेत. याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते. या रॅकेटचा संपूर्ण बंदोबस्त करून यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अद्याप यश आले नाही असे धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

धनंजय मुडे म्हणाले, कपाशीच्या बाबतीत कबड्डी नावाचा वाण लोकप्रिय आहे. कबड्डीच्या एका बॅगची किंमत 850 रुपयांच्या आसपास आहे. मात्र हे बियाणे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक भावाने विक्री केले जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. (Latest Marathi News)

तसेच शेतकऱ्यांनी भावावरून दुकानदारास विचारणा केल्यास दुकानदार सरळ सदर बियाणे संपले आहे असे सांगून मोकळे होतात. अशा पद्धतीने चढ्या भावाने विक्री व साठेबाजी केली जात असल्याचीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सोयाबीनच्या महाबीज 71 या वाणाच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. (Uttar Pradesh Fire News)

आधीच संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांची ऐन खरिपाच्या तोंडावर फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने कृषी निविष्ठा दुकानांवर करडी नजर ठेवण्यासाठी अधिकची विशेष पथके नेमावीत, तसेच आवश्यक सर्व उपाययोजना, धाडी व धडक कारवाया करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. (Delhi Fire)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: बायकोसोबत एकांत मिळेना, बापाने मुलीलाच संपवलं; मुंबई हादरली

Parliament Monsoon Session : 30 दिवसांची तुरुंगवारी; CM, PM ची खुर्ची जाणार

Thursday Horoscope : या राशीची भरभराट होणार, तर काहींचा आजार वाढणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Night Sleeping Time: रात्री किती वाजता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT