Maharashtra Politics: शिंदे लोकप्रिय 'मुख्यमंत्री', फडणवीस 'लोकप्रिय उपमुख्यमंत्री', जाहिरात वादानंतर दोघांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक

शिंदे लोकप्रिय 'मुख्यमंत्री', फडणवीस 'लोकप्रिय उपमुख्यमंत्री', जाहिरात वादानंतर दोघांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक
Shiv Sena Bjp Alliance Latest News
Shiv Sena Bjp Alliance Latest NewsSaam Tv
Published On

Shiv Sena Bjp Alliance Latest News: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप युतीमध्ये सगळं काही आलबेल सुरू आहे का, अशी चर्चा सुरू आहे. याच कारणही तसेच आहे. दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात छापून आली होती. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांचे फोटो होते.

'राष्ट्रात मोदी' महाराष्ट्रात शिंदे', अशा आशयाची ही जाहिरात होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या जाहिरातीनंतर राज्यातील अनेक भाजप नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेनेने काल नवी जाहिरात देत वातावरण काहीसं हलकं करण्याचा प्रयत्न केला.

Shiv Sena Bjp Alliance Latest News
Sanjay Raut Threat Case: संजय राऊतांचा सुरक्षा वाढवण्यासाठी धमकीचा बनाव; आरोपीच्या अटकेनंतर मनसेचा खळबळजनक दावा

यातच आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकाच मंचावर एकत्र दिसले. पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' हा राज्य सरकारचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं.

या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. सर्वसमान्य लोक शासन आपल्या दारी कार्यक्रमात आले आहेत, त्यांचे आभार मानतो, असे शिंदे म्हणाले. तर याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं. मंचावरून केलेल्या कौतुकानंतर या दोघांनीही वादावरून पडदा टाकण्याचा पर्यटन केल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

Shiv Sena Bjp Alliance Latest News
Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट, PM मोदी या दिवशी दाखवणार हिरवा झेंडा

'कोणत्याही जाहिरातींमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकारं नाही'

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमचा एकत्रित प्रवास हा 25 वर्षाचा आहे आणि आता ते घट्ट झालं आहे. आम्ही नेहमी एकत्र राहणार. जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. आमच्या एकत्र प्रवासाची चिंता नको. कोणत्याही जाहिरातींमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकारं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com