Sanjay Raut Threat Case: संजय राऊतांचा सुरक्षा वाढवण्यासाठी धमकीचा बनाव; आरोपीच्या अटकेनंतर मनसेचा खळबळजनक दावा

Sanjay Raut News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या आरोपीला कांजूर पोलिसांनी गुरूवारी बेड्या ठोकल्या आहेत.
Sanjay Raut Threat Case Updates MNS leader Sandeep Deshpande sensational claim after the police arrested the accused
Sanjay Raut Threat Case Updates MNS leader Sandeep Deshpande sensational claim after the police arrested the accusedSaam TV

Sanjay Raut Threat Case Update: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या आरोपीला कांजूर पोलिसांनी गुरूवारी बेड्या ठोकल्या आहेत. मयूर शिंदे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, राऊत यांना धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर मनसेने एक खळबळजनक दावा केला. (Latest Marathi News)

Sanjay Raut Threat Case Updates MNS leader Sandeep Deshpande sensational claim after the police arrested the accused
Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट, PM मोदी या दिवशी दाखवणार हिरवा झेंडा

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना काही दिवसांपूर्वी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. “संजय राऊतांना सकाळचा भोंगा बंद करायला लाव. त्याला कॉल उचलायला सांग. संजय राऊत आणि तुला (सुनील राऊत) गोळ्या घालणार आणि एका महिन्याच्या आत दोघांना स्मशानात पाठवणार”, अशी धमकी कॉलवरून देण्यात आली होती.

दरम्यान, आरोपीने यावेळी दोघांना शिवीगाळही केली. विशेष बाब म्हणजे त्याच दिवशी (८ जून) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा जीवे मारण्याची धमकी आली होती. एकाच दिवशी राज्यातील दोन बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

संजय राऊत धमकी प्रकरणात मयूर शिंदे नामक व्यक्ती ला अटक केली आहे का? आणि केली असेल तर त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली हे जनतेला समजलच पाहिजे.मुंबई पोलिसांनी हे जाहीर करावं, असं ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केलं आहे.

'संजय राऊतांचा सुरक्षा वाढवण्यासाठी धमकीचा बनाव'

त्याचबरोबर अटक करण्यात आलेला आरोपी मयूर शिंदे हा संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा निकटवर्तीय आहे. आरोपी मयूरचे दोघांसोबतही अनेक फोटो आहेत. राऊत बंधूंचे या गँगस्टर लोकांसोबत संबंध आहे. माझ्यावर हल्ला करणारा आरोपी सुद्धा राऊतांचाच निकटवर्तीय होता. स्वत:ची सुरक्षा वाढवण्यासाठी राऊतांनी या आरोपींचा वापर केला, असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com