Brij Bhushan Sharan Singh Case: मोठी बातमी! पॉक्सो प्रकरणात ब्रिजभूषण यांना क्लीनचिट, दिल्ली पोलिसांनी दाखल केली चार्जशीट

Clean Chit To Brij Bhushan Sharan Singh: याप्रकरणात ब्रिजभूषण यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.
Brij Bhushan Sharan Singh Case
Brij Bhushan Sharan Singh CaseSaam TV
Published On

Wrestler Case: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पॉस्को प्रकरणात ब्रिजभूषण यांना क्लीनचिट (Clean Chit) मिळाली आहे. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिंक शोषणाचे आरोप केले आहे. याप्रकरणाचा तपास करुन दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आज पहिली चार्जशीट कोर्टात सादर केली. याप्रकरणात ब्रिजभूषण यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.

Brij Bhushan Sharan Singh Case
Delhi Fire: दिल्लीमध्ये कोचिंग क्लासेसला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी विद्यार्थी वायरच्या सहाय्याने उतरले खाली, पाहा VIDEO

दिल्ली पोलिसांनी आज सात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी रॉऊज एवन्यू कोर्टात एक चार्जशीट दाखल केली. तर दुसरी चार्जशिट पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या आरोपाप्रकरणी दाखल केली. अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या आरोपात ब्रिजभूषण यांना क्लिनचिट देण्यात आली आहे.

महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले त्याचसोबत पुरावे देखील गोळा केले. दिल्ली पोलिसांनी आज याप्रकरणी 1000 पानांची चार्जशिट कोर्टासमोर सादर केली. यामध्ये पॉक्सो प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळत आहे.

Brij Bhushan Sharan Singh Case
Maharashtra Monsoon Update: मान्सूनने चिंता वाढवली, कधी होणार सक्रीय?; शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा

दिल्ली पोलिसांनी आज पटियाला हाऊस कोर्टात पॉक्सो प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या रिपोर्टमध्ये दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, या प्रकरणात ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास बंद करत आहोत.' पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालाची दखल घेत कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलै रोजी ठेवली आहे.

दिल्ली पोलिसांनी कोटाला ब्रिजभूषण यांच्याविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा हटवण्याची शिफारस केली. पोलिसांनी तक्रारदार म्हणजेच पीडिता आणि तिच्या वडिलांच्या जबाबाच्या आधारावरच अहवाल कोर्टात सादर केला. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या कुस्तीपटूने आपला जबाब बदलला होता. सुरुवातीला तिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर तिने ब्रिजभूषण भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com