Delhi News: दिल्लीच्या मुखर्जी नगर (Mukharjee Nagar) भागातील कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या कोचिंग सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर ही भीषण आग (Delhi Fire) लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांना आग विझवण्यात यश आले आहे. कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुखर्जीनगरमधील कोचिंग क्लासेसच्या तिसऱ्या मजल्यावर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. कोचिंग क्लासमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी वायरच्या सहाय्याने खिडकितून खाली उड्या मारल्या.
एएनआय या वृत्तसंस्थेने या आगीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी एकापाठोपाठ एक वायरचा आधार घेत खाली उरत आहेत. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी केली आहे.
या आगीमध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर कोचिंग क्लासेसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका केली. इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र कोचिंग क्लासेसचे या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. आग मोठी नव्हती त्यामुळे मोठी हानी टळल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.