Dhananjay Munde  saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? काय आहे नेमकं प्रकरण? पाहा स्पेशल रिपोर्ट

Dhananjay Munde Latest News: मंत्री धनंजय मुंडे आणखी एका नव्या अडचणीत सापडले आहेत. कृषी मंत्री असताना मुंडेंनी बदललेली कृषी साहित्य खरेदीची धोरणं त्यांच्या अंगशी येण्याची शक्यता आहे....मुंडेंनी नेमकी कोणती धोरणं बदलली आणि हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नेमकं या धोरणांवर काय ताशेरे ओढले? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Girish Nikam

बीड सरपंच हत्या प्रकरणात कोंडी झालेले मंत्री धनंजय मुंडे आणखी एका नव्या अडचणीत आलेत. शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदी धोरणात बदल केला होता. साहित्य खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असताना ती योजना बदलल्यानं उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आलीय. त्यावरुन 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली? असा सवाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं केलाय. या जनहित याचिकेत काय आरोप आहेत ते पाहूयात...

जनहित याचिकेतील आरोप पाहूया....

याचिकेत कोणते आरोप?

- शेतकऱ्यांसाठी कृषी साहित्य खरेदीसाठी योजना होती

- डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनेफीट ट्रान्सफर धोरण राबवण्यात आलं होतं

- 5 डिसेंबर 2016 पासून कृषी साहित्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरुवात

- 23 ऑक्टोबर 2023 तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी डीबीटी योजना बंद केली

- स्प्रे पंपाची किंमत 2600 रुपये असताना 3600 रुपये दराने शासनाने विकत घेतले

- कुठलीही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली नाही

- आयुक्तांच्या नोटला बायपास करून कृषी मंत्र्यांनी या धोरणाला मंजुरी दिली

- राज्य सरकारनं 103 कोटी 95 लाखांचा निधी देखील मंजूर केला होता

त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया वादात सापडलीय. यावर सरकार बाजू मांडेल असं महसूल मंत्री बावनकुळेंनी सांगितलंय.

बदललेल्या धोरणात आर्थिक घोटाळा करण्यासाठी वाव आहे. त्या अनुषंगाने जीआर आणि नोटशिटमध्ये बदल केल्याचा गंभीर आरोप याचिकेत आहे. नवीन सरकारमध्येही कृषी खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. माणिकराव कोकाटे कृषीमंत्री आहेत. ते मुंडेंची पाठराखण करतात की पुन्हा धोरण बदलतात याकडे अनेकांचं लक्ष आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे बॅकफूट आले आहेत. त्यात मुंडेंच्या मानगुटीवर आता डीबीटीचं भूत बसल्यानं त्यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT