Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Ganeshotsav 2025 : गणपती बाप्पा मोरया! आज घराघरात गणरायाचे आगमन, जाणून घ्या शुभमुहूर्त

Maharashtra Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र बाप्पामय झाला आहे. कोकणासह मुंबईत घराघरांत बाप्पांची प्रतिष्ठापना झाली असून फुलांचा सुगंध, मोदकांचा दरवळ आणि भक्तीचा गजर सर्वत्र दुमदुमतोय.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रभर घराघरांत गणेशाची प्रतिष्ठापना, उत्साहाचं वातावरण.

  • कोकणात विशेष आनंद; मुंबईतील मंडळांनी सजवले भव्य मखरे.

  • दादर फुल मार्केटमध्ये सकाळपासून प्रचंड गर्दी, मोदक-करंजींचा सुगंध.

  • पोलिस आणि प्रशासनाची वाहतूक व सुरक्षा व्यवस्था कडक.

अवघा महाराष्ट्र सध्या बाप्पामय झाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरांत मंगलमय वातावरण पसरले असून प्रत्येक ठिकाणी आनंद, भक्ती आणि उत्साह यांचा संगम दिसून येतोय. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात रस्ते, गल्लीबोळ आणि सोसायट्या दुमदुमल्या आहेत. कोकणातील गावांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे.

श्रावणातले विविध सणांपैकी गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी सर्वांत मोठा सण आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरी भागातून हजारो नागरिक आपल्या मूळगावी रवाना झाले. कोकणातल्या रस्त्यांवर गाड्यांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. शनिवारीपासूनच कोकणातली घरे उजळून निघाली असून आज घराघरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. आगमनासाठी चतुर्थी प्रारंभ दुपारी ०१.५४ ते बुधवार, २७ रोजी दुपारी ०३.४३ वाजेपर्यंत. तसेच श्रींच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११:०५ ते दुपारी ०१:४० वाजेपर्यंत.

मुंबईतदेखील गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. लालबाग, गिरगाव, दादर, परळ या भागांतील मंडळांनी आपापल्या बाप्पांची भव्य मखरे सजवली आहेत. प्रत्येक मंडळाने थाटामाटात स्वागत केले असून, काही मंडळांनी सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटी केल्या आहेत. दादरमधील फुल मार्केटमध्ये आज पहाटेपासूनच प्रचंड गर्दी उसळली. मोगऱ्याच्या माळा, झेंडूची फुले, कमळ, अशोकाची पाने यांची मागणी शिगेला पोहोचली. मुंबईतील मंडळांच्या बाप्पांच्या पूजेला सुरुवात झाली आहे.

राज्यातील पोलिस प्रशासनाने देखील या सणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून, मुंबई, पुणे आणि ठाण्यात वाहतुकीसाठी विशेष मार्ग आखण्यात आले आहेत. गणेश विसर्जनावेळी सुरक्षितता राखण्यासाठी आपत्कालीन पथके आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt : गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर संजय दत्तने खरेदी केली लग्जरी कार; किंमत वाचून व्हाल थक्क

Shocking: तरुण बनला हैवान! कुऱ्हाडीने वार करत आईची हत्या, नंतर मृतदेहाजवळ गाणी गात बसला

Manoj Jarange: मुंबईच्या दिशेने मराठा रॅली; कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गर्दी पाहण्यासारखी| VIDEO

Maharashtra Live News Update: मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार- मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा मार्ग मोकळा! पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी, काय आहेत अटी-शर्ती?

SCROLL FOR NEXT