Alphonso Mango  Saam Tv
महाराष्ट्र

Hapus Mango: भावा, हापूस घेताना फसवणूक होतेय? मग कसा ओळखणार खरा देवगड हापूस

Alphonso Mango : टेक्नोलॉजीमुळे खरा हापूस आंबा आता ओळखता येणार आहे. पडताळणी प्रक्रिये द्वारे ‘देवगड हापूस’ बाबतची विश्वसनीयता वाढेल यासाठी UID करण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव , साम प्रतिनिधी

बाजारात देवगड हापूस आंबा घेताना अनेकांची फसवणूक होते. देवगड म्हणून फळविक्रेता वेगळाच हापूस आंबा ग्राहकांच्या माथी मारत देत असतो. सर्वसामान्यांना खरा हापसू कसा ओळखता येत नाही. ग्राहकाची होणारी फसवणूक लक्षात घेता, खरा हापूस आंबा शोधण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय.

टेक्नोलॉजीमुळे खरा देवगड आंबा आपल्याला ओळखता येणार आहे. देवगड हापूस आंब्यावर आता बाराकोड असणार आहे. खरा देवगड हापूस ओळखता यावा यासाठी प्रत्येक पॅकअपवर TP seal UID कोड लावण्यात आलाय. त्या माध्यमातून खरा देवगड ओळखता येणार आहे. GI नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांनादेखील याचा फायदा होणार आहे.

TP Seal UID स्टिकर technology कशी काम करते?

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने GI नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार TP Seal UID वितरित केले आहेत.

शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल.

प्रत्येक स्टिकर दोन भागात विभागलेला एक स्वतंत्र युआयडी असतो. त्या कोडचा एक भाग स्टिकरच्या वरती आणि दूसरा भाग स्टिकरच्या खाली असतो.

आपल्याकडील आंबा देवगडचाच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांना +91 9167 668899 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोटो पाठवावा लागेल.

ही सिस्टम (प्रणाली) त्या स्टीकर वरील कोड वाचते.

स्टिकरच्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते. नंबर वाचण्यासाठी स्टीकर काढल्यानंतर त्याचे दोन भाग होतात.

जर व्हॉट्सअॅप द्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टममधील UID शी जुळला, तर ग्राहकास शेतकरी/विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, GI नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील पाठवला जातो.

या पडताळणी प्रक्रियेमुळे ‘देवगड हापूस’ बाबत ची विश्वसनीयता वाढेल यासाठी UID करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT