Devendra Fadnavis Saam Digital
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस जबाबदारीतून मुक्त होण्यावर ठाम; संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिल्लीकडे रवाना होणार?

Devendra Fadnavis News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आलेल्या अपयशाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत सरकारमधून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन अंकीही आकडा गाठता आलेला नाही. पक्षफूटीचं राजकारण असतानाही महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं. या अपयशाची जबाबदारी स्वीवाकारत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू असून आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आहे. धरमपेठ निवासस्थानी सुमारे ३ तास चर्चा झाल्याचं बोललं जातं आहे. संघाकडून फडणवीस यांची मनधरणीचे प्रयत्न केल्याच बोललं जातं आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला कमी जागा मिळाल्या त्यावर चर्चा झाल्याची माहिती संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या भेटीनंतर ते दिल्लीकडे रवाना होतील अशी माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. लोकसभा  निवडणुकीत देशात आणि राज्यात प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांनी शेवटपर्यंत मेहनत घेतली. मात्र राज्यात भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. जागा कमी आल्या तरी जनतेने आम्हाला नाकारलेलं नाही. देशात आमचं सरकार येत आहे. मात्र राज्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

आता विधानसभेसाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे. त्यामुळे सरकारमधील जबाबदारीमधून मूक्त करावं आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. सरकारमधून मुक्त झाल्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये कुठे कसूर राहिली, कोणत्या उणिवा राहिल्या, त्यावर विचार करून काम करता येईल, असं त्यांनी होतं. त्यानंतर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

Trending Saree Designs: पेस्टल ते मेटॅलिक, टिश्यू सिल्क साड्यांचे 'हे' आहेत ५ लेटेस्ट पॅटर्न; केवळ लग्नासाठीच नाही तर ऑफिससाठीही नक्की ट्राय करा!

Skin Care : तेलकट त्वचेसाठी नैसर्गिक घरगुती टिप्स, ट्राय करुन बघा

SCROLL FOR NEXT