Maharashtra Live News Update: ठाणे महानगरपालिका निवडणूक: वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक १ जानेवारी २०२६, आजपासून नवीन वर्षाची सुरूवात, कोरागाव भीमा अपडेट, महायुती आणि मविआमध्ये जागावाटप, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

ठाणे महानगरपालिका निवडणूक: वैध ठरलेल्या 918 उमेदवारांपैकी आजपर्यत 27 उमेदवारांनी घेतली माघार

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होत असलेल्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 प्रभाग समिती मधील 11 ‍निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 1107 नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल झाले होते. 31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत एकूण 99 नामनिर्देशन अर्ज बाद ठरले. उमेदवारांना 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे ..दरम्यान, आज दि. 1 जानेवारी 2026 रोजी एकूण 27 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, त्यानंतर एकूण 891 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.. उद्या दि. 2 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, त्यानंतर अंतिमरित्या ‘निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची’ यादी जाहीर होणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.

मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नवीन ट्विस्ट

मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नवीन ट्विस्ट...

- अनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला यांनी प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात पुन्हा दाखल केली याचिका...

- अनगरच्या नगराध्यक्ष प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील नगरपंचायत निवडणूक यांनी नगरपंचायत निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून आरोप

नाशिकमध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत छावा क्रांतिवीर सेनेचा वर्धापनदिन

- नाशिकच्या सातपूर परिसरात जाहीर कार्यक्रमात जरांगे पाटील भाषण करणार

- कार्यक्रमात व्यासपीठावर अनेक नेत्यांसह पालिका निवडणूकीतील उमेदवार उपस्थित

- पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जरांगे पाटील काय बोलतात याकडं लक्ष

kolhapur : कोल्हापुरात पहिल्याच दिवशी 48 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक

उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी 48 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी

उमेदवारी अर्ज छाननी नंतर वैध राहिलेल्या 799 उमेदवारांच्या अर्जापैकी 48 जणांनी माघार घेतल्यामुळे आता फक्त 751 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

48 जणांनी अर्ज माघारी घेतलेल्यांच्या मध्ये एबी फॉर्म देऊन वैध ठरलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयातील डमी उमेदवारांनी घेतले आहेत उमेदवारी अर्ज मागे

उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अर्ज माघारी कोण घेता याकडे सर्वांचे लक्ष

बंडखोरांची मनधरणी करण्यात नेत्यांना यश मिळणार का?

Pimpri : पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग

पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागलीये. काळेवाडी भागात काहीवेळा पूर्वी आगीची घटना घडली आहे. आगीमुळे फटाक्यांनी पेट घेतलाय, त्यामुळं दुकानातील फटाक्यांचा ही मोठा आवाज येतोय. या आवाजामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. आजूबाजूला बरीच दुकानं आहेत, एक रुग्णालय सुद्धा आहे. हे पाहत अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरुयेत. आगीचं कारण अस्पष्ट आहे.

नागपूरमधील फोम दुकानाला आग

- नागपूरच्या पिली नदी–कामठी मार्गवरील फोम दुकानाला आग..

- फोम हा ज्वलनशील असल्यामुळे आगीचा भडक्यासह धूर दूरपर्यंत निघत होता...

- धूर दूरवर दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ

- अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी पोहचले...

Nashik : मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढवणार

- नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे वादाचा नवा अंक

- दीपक बडगुजर यांच्या AB फॉर्ममुळे मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज झालाय बाद

- मात्र अर्ज बाद झाल्यानंतर देखील मुकेश शहाणे निवडणूक लढवण्यावर ठाम

- अपक्ष निवडणूक लढवणार, आजपासून मुकेश शहाणे यांनी केली प्रचाराला सुरुवात

अहिल्यानगर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार ठरला बिनविरोध...

प्रभाग क्रमांक 14 अ मधून प्रकाश भागानगरे ठरले बिनविरोध...

प्रभाग क्रमांक 14 अ मधून शिंदे शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश रासकर यांचा अर्ज बाद तर अपक्षाने अर्ज माघारी घेतल्याने झाले बिनविरोध...

सकाळी प्रभाग 7 मधून सर्वसाधारण ड मधून कुमार वाकळे ठरले होतें बिनविरोध...

नगर मध्ये भाजपा - राष्ट्रवादीच्या युतीत राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या 34 जागा....

तर 34 जागा मधून प्रभाग 7 आणि प्रभाग 14 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे आणि कुमार वाकळे ठरले बिनविरोध विजयी....

भिवंडीत भाजपाने खाते उघडले,सुमित पाटील बिनविरोध विजयी

भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विजयाचे खाते उघडले आहे.प्रभाग समिती क्रमांक 17 ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी...

18 वर्ष एकनिष्ठ राहून, प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या उमेदवाराला भरगोस मते देऊन तुम्ही आज आमच्या पदरी निराशा टाकली.

प्रमोद अण्णा निम्हण सारख्या तुमच्या निष्ठावंत शिलेदारावर तुम्ही केलेल्या अन्यायामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. 2017 पासून पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी मधील मतदार भोगत असलेल्या वनवासात तुम्ही आणखी भर घातली आहे. एकंदरीत तुम्ही पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडीला विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवत आहात असेच वाटते.!

भाजपचे नाराज उमेदवार बच्चू कडू यांच्या भेटीला...

अमरावती महानगरपालिकेमध्ये जागा वाटपावरून शक्ति महाराजांनी भाजपच्या नेत्यांना घेरलं ते शक्ती महाराज बच्चू कडू यांच्या भेटीला.

भाजपचे तिकीट नाकारल्याने नाराज झालेले भाजपचे इच्छुक उमेदवार बच्चू कडू यांच्या भेटीला...

काल शक्ति महाराजांनी भाजपचे शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर,दिनेश सूर्यवंशी यांना धारेवर धरले होते

धाराशिवमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धाराशिव मधून सकारात्मक बातमी. महिलांनी एकत्र येत दारूच्या विळख्यात अडकलेल्या दहिफळ गावात दारूबंदीचा ठराव घ्यायला भाग पाडलं. चार हजार लोकसंख्या असलेल्या दहिफळ मध्ये सात बियर बार एक देशी दारूचे दुकान आहे. तर नवीन परवान्यासाठी ही काही जण प्रयत्नशील होते. दारुमुळे अनेक घरांमध्ये भांडण होत होते. सुना नांदत नव्हत्या, तर तरुण मुलांची लग्नही रखली होती अशी व्यथा महिलांनी मांडली. महिलांनी दारू विरोधात एकत्रित येत ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीचा ठराव घेतला.

nashik  लाल कांदा काढणीला वेग; मजुरांची टंचाई भासल्याने परप्रांतीय मजुरांचा आधार

कांद्याचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चांदवड व निफाड तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे लाल कांद्याचे पीक जोमात आले असून कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे,लासलगावपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळदसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सध्या लाल कांदा काढणी जोरात सुरू आहे मात्र, सर्वत्र एकाच वेळी कामे सुरू झाल्याने लाल कांदा काढणीसाठी मजुरांची मोठी कमतरता भासत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी चांदवड तालुक्यातील पिंपळद येथील शेतकरी शांताराम टोपे यांनी आपल्या चार एकर शेतातील लाल कांदा काढणीसाठी थेट पर राज्यातील मजुरांचा आधार घेतला आहे.

लातूर शहरातल्या नाईक चौकात अपघातात पुन्हा बळी

लातूर नांदेड महामार्गावरच्या नाईक चौक येथे आज पुन्हा अपघात झाला आहे, या अपघातात एकाचा बळी गेला आहे, महामार्गावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे , लातूर नांदेड महामार्गावरच्या बायपास वरील गरुड चौक आणि नाईक चौक येथे सातत्याने अपघाताचे सत्र सुरूच आहे, दोन दिवसांपूर्वीच गरुड चौक येथे अपघातात एका वृद्ध व्यक्तीचा महामार्ग अडवत आंदोलन केल आहे . यावेळी महामार्गावर मोठा जमाव जमला आहे.

शितल देवरुखकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सेनेट सदस्य शितल देवरुखकर यांनी उल्हासनगर मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शितल देवरुखकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, शितल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या 51 क्रमांकाच्या वार्ड मधून इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी होत्या मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज होत्या आपले फोन उचलले गेले नाहीत आपल्याला आपल्या मेसेजला उत्तर देण्यात आलं नाही त्यामुळे आपण नाराज असल्याचं देवरुखकर यांनी सांगितलं.

भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पूजा जाधव उमेदवारी अर्ज मागे घेणार

पूजा जाधव यांना ऐनवेळी प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपकडून देण्यात आले आहे उमेदवारी

पूजा जाधव या आधी स्वराज्य पक्षात होत्या कार्यरत

मात्र पुणे महानगरपालिकेचे निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी केला होता भाजपात प्रवेश

भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूजा जाधव यांनी स्वराज्य संघटनेत काम करताना केली होती टीका

मात्र आता भाजपमधील अनेकांनी विरोध केल्यानंतर पूजा मोरे जाधव अर्ज मागे घेणार

भाजपच्या वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर पूजा जाधव भावूक

Pune: पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनाला गर्दी

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती दर्शनाला गर्दी

आज नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

दुपारनंतर मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी

शिवाजी रस्त्यावर गर्दीचा व्हिडीओ

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन

2025 या सरत्या वर्षाला निरोप देत आज 2026 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक नाशिकच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन झाले. येत्या आणखी तीन दिवस मंदिर 24 तास खुले राहणार असल्याचे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची आरास देखील भक्तांचे मन मोहित करत असून,सकाळ पासून राज्यभरातून भाविकांनी वणी गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

Dhule: धुळे महापालिका निवडणुकीत भाजपची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरूच

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरूच

भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 17 ब मधून सुरेखा चंद्रकांत उगले बिनविरोध

माघारीच्या पहिल्या दिवशी सुरेखा उगले बिनविरोध झाल्या आहेत

प्रतिस्पर्धी दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे बिनविरोध झाली निवड

भाजप आमदार यांनी आगे आगे देखो होता हे क्या हे सूचक वक्तव्य साम टिव्ही सोबत केले होते त्याप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवार बिनविरोध नगरसेवक झाले आहे

यापूर्वी भाजपचे दोन महिला नगरसेविका झाले होते बिनविरोध

Nandurbar: नंदुरबारच्या श्रॉफ हायस्कूलमध्ये 900 विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारांनी केले नववर्षाचे स्वागत...

नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलमध्ये गेल्या 16 वर्षांची परंपरा जपत,नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 900 विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून आरोग्याचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमाचे हे 17 वे वर्ष होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत सूर्यनमस्काराची आवर्तने करून कृतीयुक्त सहभाग नोंदवला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सेठी यांनी 'डिजिटल डिटॉक्स' आणि शारीरिक आरोग्याचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना कीप शायनिंग चा संदेश दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी स्पर्धेच्या युगात मनःशांतीसाठी या उपक्रमाची गरज व्यक्त केली. क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे पुन्हा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड

भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वी उघडला पिंपरी-चिंचवड शहरात खात

भाजपचे महापालिका निवडणुकीतील उमेदवार रवी लांडगे यांनी बनवला नवा रेकॉर्ड

रवी लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा महापालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांच्या कार्यामुळे माझी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली अशी भावना रवी लांडगे यांनी केली व्यक्त

महापालिकेत भाजप पक्ष मला जी जबाबदारी देईल ते मी स्वीकारणार असा रवी लांडगे यांनी विश्वास व्यक्त केला आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना साताऱ्यात संभाजी ब्रिगेड करून विरोध...

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून साताऱ्यात सुरुवात होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वास पाटील यांना अध्यक्ष पद देण्यावरून आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विश्वास पाटील यांनी त्यांच्या संभाजी या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या बद्दल केलेल्या चुकीच्या लिखाणाबद्दल संभाजी ब्रिगेड साताऱ्यात आक्रमक झाले आहे. यावेळी साताऱ्यातील शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी करत संभाजी ब्रिगेड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल विकृत लिखाण करणाऱ्या विश्वास पाटील यांना या अध्यक्षपदावर ठेवू नये अशी आमची मागणी होती. या अक्षय पारेख लिखाणाबद्दल आम्ही त्यांना चर्चेचा निमंत्रण दिलं होतं पण त्यांनी कुठेही आमच्याशी चर्चा केलेली नाही. आता होत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी काढावी त्यातील अक्षपाय मजकूर काढावा आणि पुन्हा ते पुस्तक प्रकाशित करावे ही आमची मागणी आहे.या साहित्य संमेलनामध्ये विश्वास पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड कडून करण्यात येत आहे. देतो देतो टाईप करतोय दोन मिनिटात शेवटचा एक बाहेर राहिलाय तेवढे करतो त्यांची रेकॉर्ड करून ऐकून टाईप करून पाठवा लागते. जर आमची भूमिका मांडणी झाली नाही तर आम्ही महाराष्ट्रात गनिमी काव्याने आंदोलन करू असा इशारा यावेळी बोलत असताना संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

अहिल्यानगर मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी AP ने खाते उघडले...

राष्ट्रवादी AP चे कुमार वाकळे यांची प्रभाग क्र.8 ड बिनविरोध निवड...

कुमार वाकळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार पोपट कोलते यांचा एकमेव अर्ज झाला होता वैध...

पोपट कोलते यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Beed: धक्कादायक! बीडच्या माजलगाव मध्ये ऊस तोडीसाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बीडच्या माजलगाव येथे धक्कादायक घटना समोर आली असून या ठिकाणी छत्तीसगड मधून ऊस तोडीसाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलीवर गावातीलच गणेश घाटूळ व अशोक पवार या दोघांनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.. दिनांक 24 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती यानंतर यातील एका मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितली.. यानंतर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून या मुली सध्या महिला बालकल्याण समितीच्या ताब्यात आहेत.. या घटनेने ऊसतोड मजूर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे..

संभाजीनगर महापालिका निवडणूकीत भाजपात सर्वाधिक बंडखोरी

संभाजीनगर महापालिका निवडणूक भाजपात सर्वाधिक बंडखोरी

सर्वाधिक अपक्ष उमेदवारी ही भाजपमधून

भाजप मध्ये 19 बंडखोर

13 अजित पवार राष्ट्रवादी गेले

18 शिंदेंसेना तर उभाठामध्ये ही काही प्रवेश

इतर पक्षात जावून लढवत आहेत निवडणूक

86 भाजप भाजप कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरला

शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांना भाग्यनगर पोलीसांनी केली अटक

शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख त्यांना भर रस्त्यात भाग्यनगर पोलिसांनी अटक केली.नांदेड महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग दोन मधून बाळासाहेब देशमुख शिवसेनेकडून इच्छुक होते.मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही.शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल तिकीट कापल्याचा आरोप बाळासाहेब देशमुख यांनी केला होता. दरम्यान आज त्यांना अचानक पणे पोलिसांनी अटक करून भाग्यनगर ठाण्यात नेले. बाळासाहेब देशमुख यांनी आज सकाळी आमदार बालाजी कल्याणकर त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली असा आरोप आहे. त्यांच्या विरोधात आमदार कल्याणकर त्यांच्या भावाने तक्रार दिल्याची माहिती भाग्यनगर पोलिसांनी दिली. त्या तक्रारीनुसार कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भाजप पाठोपाठ शिवसेनेचं खातं उघडलं! जळगावात गौरव सोनवणे बिनविरोध

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १८ ‘अ’ (अनुसूचित जमाती राखीव) मधून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे शिवसेना गोटात उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात जल्लोष साजरा केला.प्रभाग १८ 'अ' या अनुसूचित जमाती जागेसाठी गौरव सोनवणे यांच्यासह मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपली माघार घेतल्याने गौरव सोनवणे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले.बिनविरोध निवडून आलेले गौरव सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र आहेत. उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या गौरव सोनवणे यांच्या रूपाने शिवसेनेने एका युवा नेतृत्वाला संधी दिली होती. त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेने महापालिकेत आपली ताकद अधोरेखित केली असून, आगामी काळात ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

Shirdi: शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी

शिर्डीत भाविकांच्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची दमछाक...

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रवेशावेळी VIP गेटवर गोंधळ...

भाविकांच्या गर्दीला रोखताना प्रवेशद्वाराच्या जाळीचे गेट निखळले...

सुरक्षा रक्षकांनी गर्दी पांगवत तातडीने केली गेटची दुरूस्ती...

आज नववर्षानिमित्त भाविकांची साईदर्शनासाठी झालीय अलोट गर्दी...

गर्दीच्या पार्श्वभुमीवर व्हिआयपी दर्शन काही वेळ विस्कळीत...

तर ब्रेक दर्शनालाही लागला ब्रेक...

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिर परिसरातील सर्व गेट करण्यात आले बंद...

माझी मेडिकल करा, मी फॉर्म खाल्ला नाही, पुण्यातील शिवसेनेच्या "त्या" उमेदवाराचा दावा

माझी मेडिकल करा, मी कोणाचा ही फॉर्म खाल्लेला नाही. मी आमच्या शिवसेनेच्या पक्षासोबत चर्चा केली असून मी अधिकृत उमेदवार आहे. मी तिथे असलेल्या प्रतिस्पर्धी मच्छिंद्र ढवळे यांना ओळखत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांनी दिली आहे.

उद्धव कांबळे यांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक ३४ मधून उमेदवारी अर्ज भरला. पक्षाकडून २ उमेदवारांना एकच ए बी फॉर्म दिल्यामुळे कांबळे यांच्यावर त्यांच्याच प्रतिस्पर्धी मच्छिंद्र ढवळे यांचा ए बी फॉर्म खाल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप त्यांनी खोडले असून मी फॉर्म अनवधानाने फाडला पण खाल्ला नाही अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन बरोबर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे हा कार्यक्रम दुपारी पार पडणार असून कार्यक्रमाचे लिंक पाठवतो.

Pandharpur: विठ्ठल मंदिर परिसरातील परिवार देवतांच्या भंग पावलेल्या मुर्त्या बदलणार

नवीन वर्षात विठ्ठल मंदिर व परिवार देवता यामधील भंग पावलेल्या 37 मुर्त्या बदलण्यात येणार आहेत. पुरातन बदललेल्या मूर्ती मंदिरातच म्युझियम स्वरूपात संरक्षित ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल मंदिर आणि बाहेरील परिवार देवता यामध्ये भंग पावलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती नवीन वर्षात बदलण्यात येणार आहेत. सध्या विठ्ठल मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू असून मंदिरामध्ये परिसरातील विविध परिवार देवतांच्या 48 पैकी भंग पावलेल्या 37 मूर्तीं बदलण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

जतन व संवर्धन कामाची पाहणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित आर्किटेक्चर यांनी केल्यानंतर भंग पावलेल्या मुर्त्यांचे वास्तव काही दिवसापूर्वी समोर आले होते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात भग्नमूर्ती पूजेसाठी ठेवली जात नसल्याने आता भग्न पावलेल्या या शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती बदलण्या जाणार आहेत.

नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचाही बंडाचा बिगूल

- नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचाही बंडाचा बिगूल

- निनाद दिक्षीत यांनी प्रभाग २२ डी मधून फॅारवर्ड ब्लॅाकमधून उमेदवारी दाखल केलीय

- संघ मुख्यालयाच्या प्रभागात स्वयंसेवकाच्या बंडखोरीमुळे भाजपचा इथे कस लागणार आहे.

- फॅारवर्ड ब्लॅाकची उमेदवारी घेऊन निनाद दिक्षीत निवडणूकीच्या रिंगणात आहे... निनादचे वडील हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Nashik: नाशिकमध्ये भाजपमधला अंतर्गत वाद उफाळला

- पक्षाने तिकीट न दिल्याने भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज

- पत्रकार परिषद घेऊन तिकीट वाटपाच्या गोंधळाचा करणार पर्दाफाश

- तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप

- भाजपाच्याच सरचिटणीसाकडून गंभीर आरोप झाल्याने खळबळ

- अमित घुगे हे भाजपचे अनेक वर्षांपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते

- काल देखील एबी फॉर्मवरून भाजपच्या दोन गटात झाला होता गोंधळ

- बडगुजर आणि शहाणे यांना पक्षाने दिले होते एकाच ठिकाणी 2 एबी फॉर्म

Jalna: जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर…

जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. निवडणूक काळात शहरातील सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जालना पोलिसांच्या गुन्हे अभिलेखावर असलेल्या एकूण 69 अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र भरून घेण्यात आले आहे. निवडणूक काळात या आरोपींनी बंधपत्राच्या अटींचे उल्लंघन केल्यास त्यांना एक वर्षासाठी जेरबंद करण्यात येणार असल्याचा इशारा जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जालना महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, ही निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि न्याय्य वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि पोलिसांच्या गुन्हे अभिलेखावर नोंद असलेल्या 69 जणांकडून चांगल्या वर्तनाचे बंधपत्र भरून घेऊन त्यांना कोणतेही गैरकृत्य न करण्याची सक्त ताकीद पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मारकारच देवेंद्र फडणवीस करणार लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी पिंपरी ईश्वर शहर दौऱ्यावर असून. देवेंद्र फडणवीस हे अगदी थोड्या वेळात चिंचवड विधानसभा क्षेत्राचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शक्तीपीठ स्मारकारच लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर ते एक जाहीर सभा घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

- मनोज जरांगे पाटील आज १ जानेवारीला नाशिक जिल्हा दौऱ्यावर

- मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौरा

- नाशिक महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असल्याने दौऱ्याकडे लक्ष

- जरांगे पाटील नाशिकमध्ये काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

- सिन्नर येथे पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार

- छावा भारत क्रांती मिशनच्या कार्यक्रमात सहभागी होणार

- २१ व्या शतकातील भारताची दिशा यावर अधिवेशनात चर्चा

Shirdi: साई मंदिराला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट ठरतेय आकर्षक

वीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.. रंगीबेरंगी फुलांची ही सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.. भाविकांच्या देणगीतून समाधी मंदिर, साई मूर्ती, गुरुस्थान, द्वारकामाई, चावडी आदी मंदिरांना फुलांची सजावट करण्यात आली आहे.. नवीन वर्षात साईबाबांचे आशीर्वाद घेताना फुलांच्या सजावटीने वातावरण आणखी भक्तिमय झाल्याचे चित्र आहे.. साईमंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी..

Solapur: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्कलकोट नगरीत भाविकांची मोठी गर्दी

सोलापूर -

- सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्कलकोट नगरीत भाविकांची मोठी गर्दी,

- हजारो भाविक स्वामींच्या अक्कलकोट नगरीत दाखल

- स्वामींच्या चरणी लीन होतं नवीन वर्षाचा भाविकांचा संकल्प..

- अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची मंदियाळी..

- स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या तीन ते चार किलोमीटरच्या रांगा..

- स्वामी महाराजांच्या मंदिरात होणारा अभिषेक दोन दिवस भाविकांच्या गर्दीमुळे बंद असणार

- स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे पहाटे पासूनच आयोजन

Pune: ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

पुणे -

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

२०८ व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.

Pune: अपक्ष उमेदवारांसाठी १९१ चिन्हे राखीव

टिव्ही, फुटबॉल, कपाट, थाळी..अपक्ष उमेदवारांसाठी १९१ चिन्हे राखीव

राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी १९१ चिन्हे ठेवली राखून

3 जानेवारी रोजी अपक्ष उमेदवारांना होणार चिन्हाचे वाटप

भाजपसह अन्य पक्षांना उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी भरले अपक्ष अर्ज

महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांचं पक्ष चिन्ह मिळते मात्र अपक्ष उमेदवारांना ऐनवेळी चिन्ह उपलब्ध करून दिले जाते

राष्ट्रीय स्तरावरील पाच, राज्यस्तरीय पाच आणि itr राज्यातील ९ पक्षांची चिन्ह राखीव ठेवण्यात आली आहेत आणि त्यानंतर अपक्ष उमेदवारांसाठी १९१ चिन्ह राखून ठेवण्यात आली आहेत

अपक्ष उमेदवारांना कुठल्या कुठल्या चिन्ह निवडता येणार

Wardha:वर्ध्यात नववर्षानिमित्त साई मंदिरात २५ बाय २५ फुटांची भव्य दिव्य रांगोळी

वर्धा शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबा मंदिरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे रमण आर्ट परिवाराने साकारलेली भव्य दिव्य रांगोळी. तब्बल २५ बाय २५ फुट आकाराच्या या रांगोळीत अन्नपूर्णा मातेची आणि महादेवाची मनोहारी आकृती रेखाटण्यात आली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी ११ तासांचा कालावधी लागला असून सुमारे २०० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. नववर्षा निमित्तसाई मंदिरात भव्य सजावट करत विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसाठी ही रांगोळी विशेष आकर्षण ठरत आहे.

Amravati: अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांना मोठा धक्का

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवाराना मोठा धक्का.

6 झोनमधील तबल 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध;जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने कारवाई.

अनामत रक्कम न भरल्याने अनेक अर्ज बाद झोन क्रमांक 4 मध्ये सर्वाधिक 4 अर्ज अवैध.

भाजपसह विविध पक्षांना फटका

अंतिम यादी जाहीर होण्याआधी राजकीय हालचाली वाढल्या

नुसतं तंबाखू खायला दिला नाही म्हणून एकाची हत्या, अकोल्यातल्या कृषी नगर भागातील घटना

अकोल्यात नुसतं तंबाखू खायला न दिल्याने एकाची हत्या झाली. अकोला शहरातील कृषी नगर भागात हे हत्याकांड घडलंये.. संतोष भगवंतराव घावडे असं हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. तर राम कैलाश गिराम असं मारेकऱ्याच नाव आहे.. दोघांमध्ये तंबाखूवरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की त्याचे पर्यावसन हिंसक झटापटीत झाले. यामध्ये राम गिराम याने संतोष घावडे याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अन जागेवर दुर्देवी मृत्यू झालाय.. अकोल्यात नववर्षाचे स्वागत करत असतानाच ही धक्कादायक आणि रक्तरंजित घटना घडलीये.. दरम्यान, मारेकरी राम गिराम याला अकोला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Nashik: नाशिक महापालिकेसाठी एकूण १८८९ उमेदवारी अर्जांपैकी १५९२ अर्ज ठरले वैध

- नाशिक महापालिकेसाठी एकूण १८८९ उमेदवारी अर्जांपैकी १५९२ अर्ज ठरले वैध, तर २९७ अर्ज अवैध

- २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्जांची माघार घेण्याची मुदत

- २ दिवसांत वेगानं राजकीय गणितं बदलण्याची शक्यता

- पक्षाने तिकीट न दिल्याने बंडखोरी करणाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी सर्वच प्रभागात केले जाणार प्रयत्न

- अर्ज माघारीनंतर महापालिका निवडणुकीतील लढतींचं चित्र होणार स्पष्ट

मनपा निवडणुकीत 696 उमेदवारी अर्ज वैद्य, 63 अर्ज बाद

लातूर महानगरपालिकेचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे, 18 प्रभागांतील 70 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे, तर उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये एकूण 759 अर्जापैकी 696 उमेदवारी अर्ज हे वैध ठरले आहेत, तर तांत्रिक कारणांमुळे 63 उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीनंतर प्रभागनिहाय आकडेवारी स्पष्ट झाली आहे. दरम्यान शहरातील एकूण तीन प्रभागातील आक्षेपांनवर आज सुनावणी घेण्यात येणार आहे.

सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला

- सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला

- बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संबंधित हा साखर कारखाना आहे

- उसाची पहिली उचल 3 हजार रुपये आणि 3500 रुपये भाव द्या या मागणीसाठी कारखाना बंद पाडला

- उसाच्या गव्हाणीत उड्या मारत हा कारखाना बंद पाडला

- कारखाना प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरु आहे

Pune: येत्या २ दिवसात भाजपकडून पुणे महानगरपालिकेचा जाहीरनामा जाहीर होणार

येत्या २ दिवसात भाजपकडून पुणे महानगरपालिकेचा जाहीरनामा जाहीर होणार

मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच पुणेकरांना भाजपच्या जाहीरनाम्यातून काय मिळणार याकडे लक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे शहरात होणार दोन सभा

मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार अनोखा "टॉक शो"

मतदानापूर्वी भाजपकडून जय्यत तयारी

भाजपकडून पुणे शहरातील होणाऱ्या प्रचाराबाबत सुद्धा रणनीती आखलायला सुरुवात

December: डिसेंबर ठरला दहा वर्षातील सर्वाधिक कडाक्याचा थंडीचा महिना

डिसेंबर ठरला दहा वर्षातील सर्वाधिक कडाक्याचा थंडीचा महिना

डिसेंबर महिन्यात पुण्यात सरासरी १० अंश तापमान

पुण्यात डिसेंबर मध्ये ३१ पैकी १८ दिवस पारा १० अंशाच्या खाली

नोव्हेंबर मध्ये थंडीची लाट आली नाही महिनाभर पुणेकरांनी अनुभवली गुलाबी थंडी

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळाल्याने पुण्यात महिनाभर किमान तापमान 10 अंशाचा खाली

Pune: शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी होणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार

२६ एप्रिल २०२६ रोजी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार

चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास उपलब्ध

अनेक शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा इयत्ता चौथी साडेसातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करावी अशी केली होती मागणी

२६ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रथम भाषा आणि गणित या विषयाची परीक्षा

दुपारी २ ते ३.३० या वेळेत दृतीय भाषा आणि बुद्धिमता चाचणी

Nashik: लासलगाव पोलिसांचा थर्टी फर्स्टला अनोखा उपक्रम, दूधाचे केले वाटप

नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टीफर्स्टच्या दिवशी अनेक ठिकाणी मद्यपानाचे प्रकार वाढताना दिसतात. मात्र याला सकारात्मक पर्याय देत नाशिकच्या लासलगाव पोलिसांनी एक अनोखा व स्तुत्य उपक्रम राबवला. “मद्य न पिता दूध प्या” असा संदेश देत पोलिस ठाण्याजवळील मद्यविक्री दुकानासमोर नागरिकांना तब्बल 100 लिटर दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश नववर्षाचे स्वागत आरोग्यदायी व शांततेत व्हावे, तसेच मद्यपानामुळे होणाऱ्या अपघातांवर आणि गैर प्रकारांवर आळा बसावा हा होता. पोलिसांच्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

पुणे महानगरपालिकेत आंदेकर- कोमकर संघर्ष होणार

राजकारणाच्या पटलावर सुद्धा आंदेकर- कोमकर संघर्ष होणार

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही कुटुंब राजकीय आखाड्यात

पुण्यातील प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ मधून दोन्ही कुटुंब समोरासमोर

गुंड बंडू आंदेकर ची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज

त्यांच्या विरोधात वनराज यांची बहीण कल्याणी कोमकर ने भरला आहे अपक्ष उमेदवारी अर्ज

माजी नगरसेवक वनराज आंदेकर आणि त्यांचा भाचा आयुष कोमकर या दोघांच्या खून प्रकरणानंतर आंदेकर आणि कोमकर कुटुंबांमध्ये संघर्ष सुरू राहणार

Nagpur: नागपूरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला कॅाग्रेसची ॲाफर

- नागपूरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला कॅाग्रेसची ॲाफर

- भाजपची उमेदवारी न मिळाल्याने रोहीत खोपडे नाराज

- त्यामुळे त्यांनी आता कॅाग्रेस मध्ये यावं, अशी ॲाफर कॅाग्रेस आ. अभिजित वंजारी यांनी दिलीय

- रोहीत यांचा वडिलांवर विश्वास नसल्याचे अभिजित वंजारी यांचा टोला

- त्यामुळे रोहीत ला प्रदेश युवक कॅाग्रेसमध्ये मोठं पद देण्याचं आश्वासन

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला राज्यातील हजारो भाविक दाखल

आज एक जानेवारी... नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातील भावी आज कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचलेले आहेत. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत... आज पासून सुरू झालेला नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प करून त्याची सुरुवात देवीच्या दर्शनाने व्हावी ही इच्छा ठेवून हजारो व्हावे कोल्हापुरातील निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेत आहेत...

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये पुन्हा नगरसेवक होण्याच्या मैदानात

- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये पुन्हा नगरसेवक होण्याच्या मैदानात

- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल.

- परंपरागत पांढराबोडी परिसरातून निवडणूक लढवण्याचा गजभिये यांचा निर्णय.

- सहा वर्ष विधान परिषदेचे आमदार राहिल्यानंतर उलट राजकीय प्रवासाची चर्चा.

- उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक, माघार की मैदानात राहणार याकडे लक्ष.

विक्रोळीमध्ये मुसळधार पाऊस

मुंबईतील विक्रळीमध्ये मुसळधार पावसाने सुरूवात झाली आहे. हिवाळ्यात अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धावपळ उडाली.

अमरावतीत नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान निर्बंध... तीन उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद

आज 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ नंतर नवीन वर्ष २०२६ सुरू होईल. मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः तरुण नवीन वर्ष साजरे करतात. या काळात, काही लोक बिअर बार, ढाबे आणि हॉटेलमध्ये मद्यपान करतात, रात्री उशिरा वेगाने गाडी चालवतात आणि रस्त्यावर दोन किवा अधिक लोकांसह मोटारसायकल चालवतात. त्यासाठी अमरावती शहरात ठीक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली, तर चार चाकी वाहनांच्या तपासणी सुरू आहे, जे लोक दारू पिऊन वाहने चालवत आहे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, स्वतः अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला रस्त्यावर येऊन पाहणी करत आहे,

जळगावमध्ये भाजपच्या विजयाचा श्री गणेशा

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाचा श्री गणेशा केला आहे. जळगाव भाजपाच्या माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे या प्रभाग क्रमांक १२ ब मधून अखेर बिनविरोध झाले असून त्याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जितेंद्र कुंवर यांनी केली.आहे.प्रभाग क्रमांक १२ मध्ये महायुती मधून भारतीय जनता पक्षाला चारही जागा मिळालेले आहेत. यात १२ मध्ये अ मधून अनिल अडकमोल, १२ ब मध्ये उज्वलाताई मोहन बेंडाळे, १२ क मधून गायत्री इंद्रजीत राणे, १२ ड मध्ये नितीन मनोहर बरडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. दरम्यान बुधवारी दि. ३१ डिसेंबर रोजी महानगरपालिकेमध्ये दिवसभर छाननीचे काम सुरू होते.

या छाननीअंती प्रभाग क्रमांक १२ ब मध्ये वैशाली निवृत्ती पाटील यांनी भारतीय जनता पक्षातर्फे तीन अर्ज भरले होते. मात्र कुठल्याही उमेदवाराला एकाच प्रभागात ३ अर्ज भरता येत नाही. तसेच भारतीय जनता पक्षाने वैशाली पाटील यांना एबी फॉर्म दिलेल्या नाही. तसेच वेळेच्या तांत्रिक मुद्द्यावर त्यांचा ब आणि ड मधील अर्ज बाद झाला.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी दिसून येत आहे.. करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईंच्या शिर्डीत देखील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.. साईबाबांच्या समाधी मंदिरावर आकर्षक फुलांसह आकर्षक अशी विद्युत रोशनी करण्यात आली आहे.. मध्यरात्री रात्री 12 वाजता हजारो साईभक्तांच्या उपस्थितीत शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार असून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे.. साईमंदिर आणि परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Maharashtra Live News Update : गुडबाय २०२५, वेलकम २०२६: नवीन वर्षाच्या स्वागतात पुणेकर दंग, एफसी रोडवर तुफान गर्दी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com