CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

CNG Price Drop by 2 Rupees: सीएनजीच्या दरात आजपासून घसरण झाली आहे. सीएनजीचे दर १ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
CNG-PNG Price Drop
CNG-PNG Price DropSaam tv
Published On
Summary

नवीन वर्षात सर्वसामान्यांना दिलासा

सीएनजीच्या दरात घसरण

सीएनजी १ रुपयांनी स्वस्त झाला

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक महत्त्वाचे बदल झाले आहे. अशातच एक बातमी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. सीएनजी गॅसच्या किंमती घसरल्या आहेत. सीएनजीच्या किंमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना फायदा झाला आहे. वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

CNG-PNG Price Drop
Petrol Pump Fraud: सावधान! पेट्रोल भरताना 'Desnsity' द्वारे केली जाते फसवणूक; ग्राहकांनी अशी घ्या काळजी

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सीएनजीसोबतच पीएनजीच्या दरातदेखील कपात झाली आहे. सीएनजीचे दर २ रुपयांनी घसरले आहेत तर पीएनजीचे दर ०.७० रुपयांनी घसरले आहेत. यामुळे वाहनधारकांसोबतच गृहिणींनादेखील फायदा होणार आहे.

पुण्यात सीएनजीचे दर घसरले (Pune CNG Price Fall)

देशभरात अनेक ठिकाणी सीएनजीचे दर घसरले आहेत. पुण्यात सीएनजीचे दर १ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. पुण्यात हे दर ९१.५० रुपये आहेत. काल मध्यरात्री हे दर जाहीर करण्यात आले.आजपासून हे दर लागू झाले आहेत.

एकीकडे सीएनजीच्या किंमती कमी झाल्या आहे पण दुसरीकडे एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाला आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत १११ रुपयांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या १९ किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर १६९१.५० रुपयांना मिळणार आहे.

एसी, फ्रिजच्या किंमती वाढल्या (AC,Fridge Price Hike)

एसी आणि फ्रिजच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. बीई रेटिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

CNG-PNG Price Drop
EPFO Update: EPFO चा मोठा निर्णय! या PF खातेधारकांना KYC अनिवार्य; अन्यथा अकाउंट होणार बंद

पेट्रोलचे दर किती? (Today Petrol Rate)

सीएनजीच्या किंमती जरी घसरल्या असल्या तरीही पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलचे दर स्थित आहेत. मुंबईत सध्या पेट्रोलची किंमत १०३.५४ रुपये प्रति लिटर आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर किंचिंत महागले आहेत. परंतु अनेक राज्यात स्थिर आहेत. पेट्रोलचे दर वाढत आहेत. हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. परंतु याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

CNG-PNG Price Drop
Rule Change 1st January: थेट तुमच्यावर परिणाम, नव्या वर्षांपासून १० नियमात मोठा बदल, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com