CNG Crisis: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

CNG Crisis In Mumbai: मुंबईत सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अनेक उपनगरातील पंप सहा तासांहून अधिक काळ कोरडे पडत आहेत. अंधेरी ते बोरिवलीमध्ये पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
CNG Crisis  In Mumbai
Long queues of autos and cars as CNG pumps in Mumbai suburbs run dry amid sudden fuel shortage.saamtv
Published On
  • सीएनजीचा तुटवडा झाल्याने रिक्षा चालक त्रस्त झालेत.

  • तांत्रिक अडचणी व पुरवठ्यातील कपातीमुळे हा तुटवडा झाल्याची माहिती MGL कडून देण्यात आलीय.

  • आगामी २४–४८ तासांत स्थिती सुधारण्याची शक्यता

मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा झालाय. मुंबईतील अनेक पंपांवर मागील सहा-सात तासांपासून सीएनजी गॅस मिळत नाहीये. पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंधेरी ते बोरिवलीपर्यंत पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक प्रभाव जाणवत आहे.सीएनजीअभावी रिक्षाचालक हैराण झालेत. दरम्यान राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात वाढ झालीय.

तांत्रिक अडचणी व पुरवठ्यातील कपातीमुळे हा तुटवडा झाल्याची माहिती MGL कडून देण्यात आलीय. आगामी २४–४८ तासांत स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. काही चालक पेट्रोलवर रिक्षा चालवत असल्याने खर्च वाढला. मिळालेल्या माहितीनुसार, आरसीएफ कंपाऊंडमधील गेल (इंडिया) लिमिटेडच्या मुख्य गॅस पाइपलाइनला नुकसान झालंय. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या मोठ्या भागात गॅस पुरवठा प्रभावित झाल्याचं सांगितलं जात आहे.

CNG Crisis  In Mumbai
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार? नवी अपडेट आली समोर

याप्रकरणी एमजीएलने आश्वासन दिले की, घरगुती घरांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलंय. घरगुती पाईपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस मिळत राहील. व्यत्यय असूनही आवश्यक पुरवठा स्थिर राहील याची खात्री सुद्धा देण्यात आलीय.

CNG Crisis  In Mumbai
आबा, तात्या! आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच 'हे' काम करा, नाहीतर ५ लाखांचा होईल तोटा

दरम्यान दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या किमती वाढल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने दिल्ली-NCR मध्ये CNG च्या किमती वाढवल्या आहेत. नोएडा आणि गाझियाबादमध्ये CNG च्या किमती वाढल्याने वाहनचालक आणि सामान्य जनतेवर परिणाम होणार आहे. IGL ने या वाढीचे कारण वाढत्या गॅसच्या किमती असल्याचे सांगितले. सर्व शहरांमध्ये या किमती सरासरी ₹१ प्रति किलोने वाढल्या आहेत. कानपूरमध्ये किंमत ८७.९२ रुपयांवरून ८८.९२ रुपयांपर्यंत वाढली आहे. तर नोएडा-ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये (हापूर वगळता) ही ८४.७० वरून ८५.७० पर्यंत वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com