आबा, तात्या! आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच 'हे' काम करा, नाहीतर ५ लाखांचा होईल तोटा

Ayushman Bharat Update: सरकारने आयुष्मान भारत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट जारी केलीय. आयुष्मान कार्ड धारकांना दरवर्षी ५ लाखांचे आरोग्य कव्हर मिळते. हा लाभ मिळत रा राहण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Ayushman Bharat Update
Ayushman Bharat issues e-KYC update for all cardholders; failure may stop benefits.saam tv
Published On
Summary
  • ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

  • जवळच्या CSC केंद्रात केवायसी करता येईल.

  • ई-केवायसी न केल्यास ५ लाखांचा आरोग्य लाभ बंद होऊ शकतो

आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठ्या आरोग्य योजना आहे. या योजनेचा लाभ लाखो लोक लाभ घेत आहेत. या योजनेतून प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येते. दरम्यान सरकारने काही दिवसापूर्वी आयुष्यमान भारत योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट जारी केलंय. (Ayushman Card Holders Must Complete E-kyc Or Lose ₹5 Lakh Benefits)

जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल तर याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागले. ते काम म्हणजेच केवायसीचं. हो लाडक्या बहीण योजनेप्रमाणे या योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही केवायसी केली नाहीतर योजनेचा फायदा घेता येणार नाहीये.

जर ई-केवायसी वेळेवर पूर्ण केली नाही तर आयुष्मान कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. रुग्णालयात मोफत उपचार मिळून शकले नाहीये. लाभार्थ्याचे नाव योजनेच्या यादीतून वगळले जाऊ शकते. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या. ई-केवायसी सोपे आणि जलद करण्यासाठी चार सोपे पर्याय देण्यात आलेत. ओटीपी पडताळणी, फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन आणि फेस ऑथेंटिकेशन.

Ayushman Bharat Update
Traffic challan dispute: चुकीचं ट्रॅफिक चालान आलंय? ऑनलाइन तक्रार कशी करणार?

या पद्धतींचा वापर करत लाभार्थी केवायसी करू शकणार आहे. लाभार्थी मोबाईल फोन किंवा जवळच्या सीएससी सेंटरचा वापर करून ई-केवायसी प्रक्रिया जलदपणे पूर्ण करू शकतो.

Ayushman App डाउनलोड करा

तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर गुगल प्ले स्टोअर उघडा. त्यात Ayushman Bharat Digital Mission किंवा ABHA / Ayushman App शोधा. अधिकृत अॅप उघडा.

त्यानंतर तुम्ही तुमची भाषा (हिंदी/इंग्रजी) निवडा. तुमच्या मोबाइल नंबरने लॉग इन करावी. त्यानंतर नंबरवर आलेला ओटीपी टाका.

अ‍ॅपच्या होम पेजवर "Ayushman Card" किंवा आयुष्मान कार्ड जनरेट करा या पर्यायावर क्लिक करा.

Ayushman Bharat Update
Travel Insurance Tips: फ्लाइट रद्द होऊ द्या नाहीतर बॅग हरवू द्या; इन्शुरन्स असेल तर 'डोन्ट वरी', Travel Insurance साठी आत्ताच करा अर्ज

त्यानंतर तुम्हाला "कंप्लीट ई-केवायसी" हा पर्याय दिसेन. त्यावर क्लिक करा.

आधार ओटीपी पडताळणी आणि आधार बायोमेट्रिक्स - मोबाइलद्वारे ओटीपी पडताळणी करणे सोपे आहे. त्यामुळे ओटीपीद्वारे आधार ई-केवायसी करण्याचा पर्याय निवडा. त्यात तुमचा आधार क्रमांक टाका .

तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर UIDAI कडून एक OTP पाठवला जाईल. तो ओटीपी टाका आणि पुढील प्रक्रिया करा. त्यानंतर तुमचा केवायसी होईल.

केवायसीनंतर, "जनरेट आयुष्मान कार्ड" वर क्लिक करावे. त्यानंतर

डिजिटल आयुष्मान कार्ड काही सेकंदात तयार होईल. डिजिटल आयुष्मान कार्ड काही सेकंदात तयार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com