Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

नाराजीनाट्याचा पुढचा अंक! फडणवीसांच्या स्वागत बॅनरवरून अमित शहांचा फोटो गायब

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने विधानसभेत बहुमताचा आकडा गाठून आपले सरकार मजबूत असल्याचे दाखवून दिले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यांदाच नागपूर शहरात आले आहेत. यावेळी त्यांच्या समर्थकांसह भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे नागपुरात जंगी स्वागत केले. नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागताचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Devendra Fadnavis Latest News)

राज्यात भाजप आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद मिळणार अशा चर्चा सुरू होत्या, पण ऐनवेळी भाजपने मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित केले, तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे राज्यातील भाजप कार्यकर्ते केंद्रीय नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री पद देण्याला केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोध केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शहरात बॅनर लावले आहेत. या बॅनरवर अमित शाह यांचा नसल्याचे दिसत आहे.

शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे फोटो आहेत. पण या फोटोत अमित शाह यांचा फोटो नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, पक्षासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच नागपुरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्रीपद आलं आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीसांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी 'नागपूरकरांनी नेहमीच मला साथ दिली आहे. पाच वेळा मला आमदार केले आहे. दोन वेळ नगरसेवक म्हणून आणि महापौर म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. आज पुन्हा मी उपमुख्यमंत्री म्हणून आलो तर तुमचे प्रेम कायम आहे. तुमचे मनापासून आभार मानतो', असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

Mango Health Benefits: उन्हाळ्यात दररोज खा एक कच्चा आंबा; होतील जबरदस्त फायदे

Jalna Lok Sabha: मनोमिलन झालं, मतभेद मिटले! रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी अर्जून खोतकर उतरले मैदानात

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेरलं

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

SCROLL FOR NEXT