Maharashtra Govermnet News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Govermnet : ५ लाख रोजगार निर्माण होणार, महाराष्ट्र सराकारचे ९ धडाकेबाज निर्णय

Maharashtra Govermnet News : महाराष्ट्र सराकारचे ९ धडाकेबाज निर्णय घेतलेत. यात ५ लाख रोजगार निर्मितीबाबत देखील निर्णय घेण्यात आलाय.

Vishal Gangurde

मुंबई : फडणवीस सरकारने आज मंगळवारी ९ महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकरच्या निर्णयाचा फायदा थेट फायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. सरकारने रोजगार निर्मितीपासून ते तुकडेबंदी अधिनियमासंदर्भातील धोरणांपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ९ महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या निर्णयांमुळे युवकांना दिलासा मिळणार आहेत.

महाराष्ट्र सराकारचे ९ महत्वाचे निर्णय

उद्योग विभाग

राज्याचे रत्ने आणि दागिने धोरण – २०२५ जाहीर. सोने, चांदीचे दागिने,हिरे-रत्ने यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे. एक लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितेच उद्दीष्ट आहे.

नगर विकास विभाग

राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे धोरण. सांडपाण्यावरील प्रक्रीयेमुळे आणि त्याच्या पुनर्वापराव्दारे चक्रीय अर्थव्यवस्थेस (सर्क्युलर ईकॉनॉमी)ला चालना मिळेल. सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, आरोग्यदायी परिसर या संकल्पनेला बळ मिळणार आहे. राज्यातील ४२४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये धोरण राबविण्यात येणार आहे.

महसूल विभाग

तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता आहे. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. अधिनियमातील कलम ८ (ब) चे परंतु वगळून कलम ९ मध्ये पोट-कलम (३) नंतर पंरतुक समाविष्ट करण्यात येणार आहे.

गृहनिर्माण विभाग

मुंबईत झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना (Slum Cluster Redevelopment Scheme) राबविणार आहे.

महसूल विभाग

अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेअंतर्गत ई-बस डेपो व चार्जींग व्यवस्थेकरिता मौजा बडनेरा येथील २ हेक्टर ३८ आर जमीन ३० वर्षासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक निवासी आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय. अशा ९८० आश्रमशाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार.

वस्त्रोद्योग विभाग

खासगी सूतगिरण्यांना एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, २०२३-२८ अंतर्गत सहकारी सूतगिरण्यांप्रमाणे युनीट मागे ३ रुपये वीज अनुदान सवलत लागू करण्याचा निर्णय. राज्य औद्योगिक समुह विकास योजनेंतर्गत क्लस्टरमधील सुतगिरण्यांना दिलासा मिळणार.

वस्त्रोद्योग विभाग

यंत्रमागधारकांना वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार. शासन निर्णय जारी झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत नोंदणी करावी लागणार.

विधि आणि न्याय विभाग

अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय, या न्यायालयाकरिता आवश्यक पदांना मान्यता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Farmer’s Daughter : शेतकरी बापाने आयुष्य संपवलं; लेकीचं पोलीस होण्याचं स्वप्न, महाराष्ट्र पोलीस मदतीला धावले

Kolhapur-Satara Highway: सातारा -कोल्हापूर महामार्गवरील वाहतूक कोंडी फुटणार ; सरकारचा काय आहे प्लान?

Maharashtra Live News Update: जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना

धक्कादायक! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येताच डोक्याचा झाला चेंदामेंदा

SCROLL FOR NEXT