
मंत्र्यांच्या ताफ्यात गाडी पुढे-मागे करण्याच्या वादावरून भाजपचे दोन गट भिडले
अमन श्रीवास्तव व ध्रुव सिंह यांच्या समर्थकांमध्ये राडा
वाद पोलिसांत तक्रारीपर्यंत गेला
दोन्ही गटांनी पोलिसांत एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची केली मागणी
पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणलीये
उत्तर प्रदेशचच्या आजमगढमध्ये मोठा राडा झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री अनिल राजभर यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते भिडल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची जोरदार हाणामारी आणि शिवीगाळ झाली. दोन्ही गटाचा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला.
मंत्री अनिल राजभर हे आजमगढमधून नेहरू हॉल येथे निघाले होते. तेथील हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जाताना ताफ्यात गाडी पुढे-मागे करण्यावरून समर्थक भिडले. ताफ्यात एकीकडे भाजप युवा मोर्चाचे मंत्री अमन श्रीवास्तव होते. तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष धुव्र सिंह यांच्या टीमशी संबंधित कार्यकर्ते होते.
दोन्ही गटाची ताफ्यात बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांत एकमेकांची तक्रार देताना दोन्ही गट भिडले. दोन्ही गटाला शांत करणे हाताबाहेर गेलं. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. दोन्ही गटाचा राडा हा आजमगढ शहरात घडला आहे.
बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला पोहोचले. एका गटाने पोलिसांत गन्हा नोंदवण्याची मागणी केली. दोन्ही गटातील वाद सोडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करत होते. मात्र, दोन्ही गटातील वाद आणखी टोकाला गेला. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना शिवीगाळ केली.
पालघरच्या बोईसरजवळील सरावली ग्रामपंचायत कार्यालयातच तुंबळ हाणामारी झाली. ग्रामपंचायतमधील लिपिक आणि उपसरपंचामध्ये हाणामारी झाली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किरकोळ वादातून हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उपसरपंच शुभम वडे आणि लिपिक संकेत सावंत यांच्यात कार्यालयातच हाणामारी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.