महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहे.देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. या काळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात नागरिकांसाठी काय काय योजना राबवल्या ते जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री फेलोशिप योजना (CM Fellowship Scheme)
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २०१५ साली मुख्यमंत्री फेलोशिप योजना सुरु केली. हा ११ महिन्यंचा कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना प्रशासकीय अनुभव दिला जातो. हा उपक्रम ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना शासकीय विभागात काम करण्याची संधी मिळते. त्याचसोबत स्टायपेंड आणि इतर भत्तेदेखील दिले जातात.
जलयुक्त शिवार अभियान (Jalyukt Shivar Yojana)
राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी ही योजना सुरु केली होती. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात शाश्वती मिळावी तसेच पाणलोटांच्या माध्यमातून सिंचनाची उपलब्धता वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली. या योजनेत कोरडवाहू प्रदेशात काही शेततळे बांधण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना (Krushi Sanman Yojana)
२०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ३४,०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प (Mararhwada Water Grid Project)
देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ मध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरु केला. मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या खोऱ्यात पाणी साठवण्याचे काम केले गेले होते.
लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana)
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.