भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीस यांचे नाव आघाडीवर चर्चेत आहे.
फडणवीस यांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया देत स्पष्ट भूमिका मांडली.
अध्यक्ष निवड योग्य वेळी पक्ष स्वतःच करेल असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ मागच्या वर्षी संपला. त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे दोन जबाबदाऱ्या आहेत. ते भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडत आहेत. जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपून दीड वर्षे झाले तरी देखील भाजला दुसरा अध्यक्ष मिळालेला नाही.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वाच आघाडीवर घेतले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत राज्यात जोरदार चर्चा देखील सुरू आहेत. यावर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'सध्या मी राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि पुढील ५ वर्षे मी या पदावरच राहणार आहे.'
भाजप अध्यक्षपदाच्या निवडीबाबत काही दिवसांपूर्वी सर संघचालक मोहन भागवत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. जर संघाने भाजप अध्यक्ष निवडला तर त्याला इतका वेळ लागणार नाही. त्यांच्या या विधानानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे.
इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांना मोहन भागवत यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, 'संपूर्ण उत्तर संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उत्तरामध्येच लपलेले आहे. त्यांच्या विधानावरून हे स्पष्ट होते की भाजपमध्ये कोणताही एक व्यक्ती पदासाठी कोणालाही निवडत नाही. उलट याबाबत पक्ष निर्णय घेतो. अध्यक्ष निवडण्यासाठी भाजपची स्वत:ची प्रक्रिया आहे. '
भाजप अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत त्यांनी पुढे सांगितले की, भाजपच्या अध्यक्षपदाची निवड योग्य वेळी होईल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. जेव्हा भाजप अध्यक्षांबाबत निर्णय घेतला जातो तेव्हा पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. मी याबाबत उत्तर देण्यासाठी पूर्णपत्रे पात्र नाही कारण मी भाजप अध्यक्षांच्या निवडीचा निर्णय घेणाऱ्या समितीचा भाग नाही आहे.'
भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तुमचे नाव आघाडीवर आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, 'पक्षाच्या कामकाजाच्या ज्ञानाच्या आधारे मी ५ वर्षांसाठी महाराष्ट्रात आहे. पाच वर्षांनंतर पक्ष काय निर्णय घेतो ते पाहूया.' यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, 'तुम्ही भाजप अध्यक्षांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. भाजप स्वतःच तो प्रश्न सोडवेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.