Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis on Uddhav thackeray : देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे विकासवरही काहीच बोलत नसल्याचं म्हणत फडणवीसांनी टीका केली.
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis on Uddhav thackeray Saam tv
Published On
Summary

भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी विजय संकल्प मेळावा घेतलाय

या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली जोरदार टीका .

विकासाच्या मुद्द्यावर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा प्रश्न

मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीचा दाखला देत मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आगामी मुंबई महापालिकेसाठी देखील भाजपने मोठी फिल्डिंग लावली आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. तर मुंबईतील विविध भागात भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने मुंबईत विजय संकल्प मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

भाजपच्या संकल्प मेळाव्यात महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी पाहायला मिळाली. या उपस्थित कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'काही उच्चके रोज सकाळी मोदींना प्रश्न विचारतात. पण अशा उच्चक्यांना मुंबईतील लोकांनी २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर दिलं आहे. मुंबई कोणाची, २०१४, २०१९, २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी उत्तर दिलं आहे'.

Devendra Fadnavis News
Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

'मुंबई ही भाजप, महायुतीची आहे. मुंबई ही भाजप, शिवसेना महायुतीची आहे. शिवसेना म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची असून त्याचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत. हे उत्तर दिलं. आज बघू शकता. तुम्ही यांची भाषणे बघा. यांच्या भाषणासाठी १०० रुपये द्यायला तयार आहे. त्यांची मागील १० भाषणे काढा. त्यातून विकासावर एक वाक्य दाखवा. मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी विकासाच्या व्हिजनचं एक वाक्य दाखवा. त्यानंतर १०० रुपये माझ्याकडून घेऊन जा. ते बोलतच नाही. बोलूही शकत नाही. गिरणगावातील मराठी माणूस हद्दपार कोणी केला, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis News
Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

मेट्रो प्रकल्पावरून फडणवीसांचा हल्लाबोल

मेट्रो प्रकल्पावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'आज आपण पाहून शकतो, याठिकाणी मेट्रोचं जाळं तयार केलं. १५ वर्षांत ११ किलोमीटर आणि १० वर्षात ३५४ किलोमीटर हा फरक आहे. हे परिवर्तन पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी हे येत्या ३० तारखेला कफ परेड सुरु होणारी मेट्रो सेवा ही त्यांच्या हस्ते सुरु होणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com