deur bichukale villagers andolant at railway track near satara
deur bichukale villagers andolant at railway track near satara  Saam Digital
महाराष्ट्र

Satara: बिचुकले, देऊर ग्रामस्थ मागण्यांवर ठाम, रेल्वे मार्गावर छेडलं आंदोलन

ओंकार कदम

रेल्वे क्रॉसिंग अंडरपास करूनही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आम्हांला रस्ता चांगला करु द्यावा अशी मागणी करत सातारा जिल्ह्यातील काेरेगाव तालुक्यातील बिचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांनी आज (मंगळवार) रेल्वे मार्गावर आंदोलन केले.

यावेळी आंदाेलक म्हणाले रेल्वे क्रॉसिंग अंडरपास मध्ये मागील सहा महिने पाणी साठत असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरी देखील रेल्वे प्रशासनाने सोयी सुविधांचा अभाव असताना हे काम सुरू ठेवले.

यामुळे बीचुकले आणि देऊर ग्रामस्थ भडकले. आज त्यांनी रेल्वे मार्गावर येत आंदाेलन छेडले. यावेळी रेल्वे प्रशासनातील अधिका-यांनी आंदाेलनस्थळी भेट दिली. आंदाेलकांनी रेल्वे क्रॉसिंग मध्ये रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रेल्वे रूळ ओलांडावा लागत असल्याचे सांगितले. यावर तातडीने ताेडगा काढावा अशी मागणी आंदाेलकांनी रेल्वे अधिका-यांना केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांना हवं ते मिळेल, वाचा राशीभविष्य

Weekly Horoscope: आजपासून या 5 राशींचे येणार अच्छे दिन, 7 दिवस प्रत्येक गोष्टीत मिळेल यश

IND Vs ZIM: रिंकू सिंहचा षटकार पाहून डोक्याला लावाल हात; मुझारबानीच्या चेंडूला पाठवलं थेट मैदानाबाहेर, Video

Who Is Mihir Shah: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे? BMW ने महिलेला उडवलं, अद्यापही आहे फरार

Gujarat Bus Accident: सापुतारा घाटात भीषण अपघात; 70 पर्यटकांना घेऊन जाणारी बस कोसळली दरीत

SCROLL FOR NEXT