Deputy CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक मायदेशी परतणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था

Iran-Israel War: इराण-इस्राइल या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भडका उडला. दुबईमध्ये महाराष्ट्रातील अनेक नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी विशेष विमानाची व्यवस्था केली.

Priya More

Summary -

  • दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था

  • फुजैरा एअरपोर्टवरून दोन विमाने आज भारताकडे रवाना

  • एकूण १६४ प्रवासी मुंबईत दाखल होणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार आहेत. ही विमानं आज संध्याकाळी भारतात येणार असून यामधून १६४ प्रवासी मुंबईत दाखल होणार आहे.

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पावले उचलली आहेत.

या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज दुपारी फुजैरा एअरपोर्ट (Fujairah Airport) वरून उड्डाण घेणार आहेत.

• VTGSO – संध्याकाळी ३.३० वाजता टेकऑफ

• VT GSH – संध्याकाळी ४.३० वाजता टेकऑफ

या दोन्ही विमानांमधून एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत मुंबई एअरपोर्टवर दाखल होतील. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर या भागातील इतर नागरिकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच या मराठी नागरिकांशी संवाद साधला होता.

'तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,', असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांशी अखंड संपर्क साधून या १६४ प्रवाशांना मायदेशी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahila Samriddhi Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळणार ₹२५००; सरकारने केली मोठी घोषणा

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra Live News Update: मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Ashok Kharat: 'ईशानेश्वर महाराज आले' सांगत साप दाखवला, उत्तर पूजेच्या नावाखाली ५ कोटींचा गंडा; भोंदूबाबा खरातचा नवा कारनामा

5 Salad Recipes For Weight Loss: नाश्त्याला खा 'हे' ५ प्रकारचे सॅलड; जिम न लावताही झपाट्याने कमी होईल वजन

SCROLL FOR NEXT