devendra Fadnavis
devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Video | राणा दाम्पत्य हे गरिबांचे कैवारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय डाफ

Devendra Fadnavis News : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्यांना काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून चर्चेत आले होते. राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा बोलणार घोषणा केल्यानंतर त्यांना १४ दिवस कोठडीत काढावे लागले होते. याच राणा दाम्पत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमरावतीत स्तुती केली आहे.

अमरावतीमध्ये आज दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. बॉलिवूड स्टार सुद्धा उपस्थिती या दहीहंडी स्पर्धेत दर्शवणार आहे. अमरावतीमध्ये ही दहीहंडी आकर्षण असते. या दहीहंडीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राणे दाम्पत्यांवर स्तुती केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आपलं सरकार आलं तर कसं खुलंखुलं वाटत आहे. दोन वर्षे बंदिस्त होते. दहीहंडीनंतर इतर सर्व सण जोरात होणार आहे. कारण आता आपलं सरकार आलं आहे. आता हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना घाबरण्याची गरज नाही. हनुमान चालीसा म्हणत १४ दिवस कोठडीत जाणारे माझे रवी राणा आणि नवनीत राणा यांचा मला अभिमान आहे. आज केवळ दहीहंडी नाही तर रक्तदान करणाऱ्याचे आभार आहे. राणा दाम्पत्य गरिबांचे कैवारी आहेत'.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'आता मागे जायचे नाही, विदर्भाचा विकास जोरात होणार आहे. दहीहंडीची मलाई एकट्याने खायची नसते, तर ती सर्वांना द्यायची असते. एकनाथ शिंदे आणि मी विकासाची दहीहंडी सर्वांपर्यंत पोहचवणार आहोत'.

नवनीत राणा यांची अजित पवारांवर टीका

खासदार नवनीत राणा यांनी देखील उपस्तितांना संबोधित केले. खासदार नवनीत राणा म्हणाले, ' २०१४ मध्ये तुम्ही सोबत नव्हते म्हणून खासदार झाले नाही आणि २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री फडणवीससोबत नव्हते तरी तुमचा आशीर्वाद होता, म्हणून मी खासदार झाले'.

यावेळी नवनीत राणा यांनी अजित पवारांवर देखील टीका केली. 'काही नेते मेळघाटमध्ये जाऊन आले आणि कुपोषणावर बोलले. एवढे वर्ष राज्य केले, तेव्हा लक्षवेधी लावली का नाही, असा सवाल करत खासदार राणा यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. 'जे लोक भ्रष्टाचार करतात त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, म्हणून ईडी योग्य काम करत आहे', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईचं नेमकं चुकलं तरी कुठं? कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितली पराभवाची कारणं

Nawazuddin Siddiqui Birthday : मेडिकल केमिस्ट- वॉचमॅन ते सुपरस्टार; जाणून घ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा संघर्षमय प्रवास

Today's Marathi News Live: मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला भीषण आग

Chakan Gas Tanker Explosion: पुण्यात गॅस टँकरचा स्फोट कसा झाला?, समोर आली धक्कादायक माहिती

Milk Powder : दूध नसल्यास तुम्हीसुद्धा मिल्कपावडरचा जास्त वापर करता? वाचा आरोग्यावर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT