उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे कान उघडण्याचे काम...

मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवेत - ठाकरे
Uddhav Thackeray/Gulabrao Patil
Uddhav Thackeray/Gulabrao PatilSaam TV
Published On

सुशांत सावंत -

मुंबई: मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवे, उद्या अगदी मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे असं म्हणत माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाव न घेता मंत्री गुलाबराव पाटीलांना टोला लगावला तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांचे कौतुक केलं.

शिवसेना उपनेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पदाच्या कार्यकाळातील कार्यासंदर्भात अहवाल तयार करण्यात आला आहे. या डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती यांच्या कार्याचा अहवाल पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

ठाकरे म्हणाले, नीलम ताई शिवसैनिक होऊन किती वर्षे झाली मला आठवत नाही. नीलमताई शिवसेनेच्या विचारांच्या नव्हत्या, त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. एकदा मला निरोप आला नीलम ताईंना तुम्हाला भेटायचा आहे. मी म्हणालो त्या तर आपल्या विचारांच्या नाहीत, पण मी त्यांना भेटलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला त्या म्हणाल्या मला शिवसेनेत यायचं आहे.

पाहा व्हिडीओ -

नीलमताईंना मी एखादा विषय सोपवला आणि त्यांनी अर्धवट सोडला असे कधीच झालेल नाही. त्या दिवसरात्र काम करतात. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. तो आहेच दिल्लीत निर्भयानंतर देश हादरला आहे. आज भंडारामध्ये (Bhandara) जे घडले ते भीषण आहे. महिलांच्या बाबतीत काही घडले तर पक्ष विसरून सर्वानी एकत्र आले पाहिजे, महिलांबाबत सर्वानी एकत्र यायला हवं असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना सभागृहात खडसावलं होत. याच पार्श्वभीवर पत्रकारांशी बोलतना ठाकरे म्हणाले, 'सभागृहात कुणी कसे वागायचे हे नीलम ताई तुम्ही खडसावून सांगितले आहे. सभागृहात आलं तर शिस्तीत वागलंच पाहिजे. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो.

Uddhav Thackeray/Gulabrao Patil
देवेंद्र फडणवीसांच्या वजनाएवढं रक्तदान करण्याचा राणा दाम्पत्याचा निर्धार

हे धन्यवाद ते कोण होते, कुठून आले, यामुळे नाही तर कोणताही व्यक्ती असला तरी सभागृहाची उंची पाळायला हवी. सभागृहाची एक मर्यादा आहे. मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र पाळायलाच हवेत. उद्या अगदी मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे, असं देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com