Ajit Pawar statement about Sharad Pawar  Saam Tv News
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय' अजित पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या; नेमकं काय म्हणाले...

Ajit Pawar : बीडमध्ये अजित पवारांनी काकांच्या कृपेचा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. मात्र अजित पवार नेमकं काय म्हणाले? काका-पुतण्या एकत्र येण्याची शक्यता का आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टीव्ही

बीड : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष पेटला असताना दिलखुलास अजित पवारांनी काका शरद पवारांची आठवण काढलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्यात, आणि पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात. त्या बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातील वक्तव्यानं राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काका शरद पवारांना धोबीपछाड दिला. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत.

काका-पुतण्या भेटी-गाठी

12 डिसेंबर 2024

वाढदिवसानिमित्त शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भेट

23 जानेवारी 2025

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भेट आणि अर्धा तास बंद दाराआड चर्चा

27 जानेवारी 2025

तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवारांचा शरद पवारांना फोन

22 मार्च 2025

अजित पवार आणि शरद पवार बैठकीसाठी एकत्र

खरंतर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत धुसफूस वाढलीय. अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा रंगलीय. एवढंच नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला जात असल्याने महाविकास आघाडीतील मतभेद समोर आलेत. मात्र महाविकास आघाडीत कोणत्या मुद्द्यावर मतभेद आहेत? पाहूयात.

महाविकास आघाडीत कोणत्या मुद्द्यावर मतभेद?

धारावी प्रकल्पाला काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध तर पवारांची वेगळी भूमिका

स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवण्याबाबत एकवाक्यता नाही

काका-पुतण्याची वाढती जवळीक, ठाकरे गट नाराज

विधानसभा निवडणुकीनंतर काका-पुतण्याच्या भेटीगाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यातच आता अजित पवारांनी काकांची आठवण काढल्याने पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची चर्चा रंगलीय. मात्र ही चर्चा पेल्यातील वादळ ठरणार की पवारांची पॉवर खेळी? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT