Ladki Bahin Yojana Update Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव द्या, आमदाराने कारण सांगितले, मुख्यमंत्र्यांचे नाव घेत म्हणाले...

Ladki Bahin Yojana Maharashtra : अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ असं नाव देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Maharashtra Ladki Bahin Yojana latest political news : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरात शोककळा पसरलीये. त्यामुळं अजित दादांचे स्मृति जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्यावं, अशी मागणी होऊ घातली आहे. 'अजित दादांची लाडकी बहीण योजना' असं नाव या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असून त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचेही मिटकरी म्हणालेत.

दरम्यान, कालचं पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित या संघानं ऐतिहासिक निर्णय घेतलाये. या कात्रज दूध संघाने 'अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज' असे नामकरण करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत केलाय. अशातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्यावं, अशी मागणी मिटकरी यांनी केलीये. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही अजितदादांच्या अगदी जवळचे होते. अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे दोघेही नेते भावाप्रमाणे उभे राहिलेत.

पुढं बोलतांना मिटकरी म्हणाले की अजितदादा कुटुंब प्रमुख म्हणून चांगले होते, तसेच जनतेत राहणारा लोकनेता सर्वांना आवडणारा आणि हवाहवासा. आजचा सातवा दिवस आहे, अजूनही महाराष्ट्र धक्यातून बाहेर निघालेला नाही. अशा व्यक्तींच्या स्मृती जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला, 'अजित दादांची लाडकी बहीण योजना' असं नाव द्यावं, अशी मागणी त्यांनी केलीय.

अजितदादांनी जनसंवाद यात्रा काढली होती, हजारो लाखो बहिणी त्यांना राख्या बांधत होत्या. आज चांगली योजना सरकारकडे आहे, दादांनी देखील त्या योजनेसाठी पुढाकार घेतला होता, मोठा निधी दिला होता. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रमाणेचं या लाडक्या बहिणी योजनेला 'अजितदादांची लाडकी बहीण योजना' असं नाव द्यावं, अशी भावना मिटकरींनी व्यक्त केली.

एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं

विमान अपघातासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. या माध्यमातून विमान अपघातासंदर्भातील अनेक प्रश्नांवर चर्चा होईल, असे ते म्हणालेत. दरम्यान, यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मागणी करणार असल्यास आमदार अमोल मिटकरी म्हणालेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu : बच्चू कडू राजकीय 'प्रहार' करणार, शिंदेंच्या शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेणार

Mumbai Traffic : मुंबईत १ मे रोजी 'या' ठिकाणी वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची तात्काळ मदत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कधीही येऊ शकतात ₹३०००; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत अपडेट

सस्पेन्स कधी संपणार? उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का? आज महत्त्वाची बैठक, अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT