Laxman Hake News : Saam tv
महाराष्ट्र

Laxman Hake News : 'धोबी, नाभिक समाजाला SC आरक्षण द्या'; हाकेंची मागणी, कोणत्या राज्यात धोबी समाज कोणत्या यादीत?

laxman hake on sc reservation : राज्यात आरक्षणासाठी जाती-जातीत स्पर्धा सुरु असताना लक्ष्मण हाकेंनी नाभिक आणि धोबी समाजाला एससी आरक्षण देण्याची मागणी केलीय.. त्यावरुन नवा वाद पेटलाय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

लक्ष्मण हाकेंनी थेट धोबी आणि नाभिक समाजाला SC आरक्षणाची मागणी करुन नव्या वादाला तोंड फोडलंय. तर एससी आरक्षणाकडे पाहिलं तर डोळे काढण्याचा इशाराच ऑल इंडिया पँथर सेनेनं दिलाय.

खरंतर मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर सरकारने काढला आणि त्याचाच आधार घेत राज्यात आरक्षणासाठी स्पर्धा सुरु झाली.. आधी बंजारा समाजाने आदिवासी आरक्षणाची मागणी केली. तर त्यानंतर धनगर समाजही आक्रमक झालाय...हे कमी होतं की काय लक्ष्मण हाकेंनी आता धोबी आणि नाभिक समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दा पुढे आणल्यानं आरक्षणाचा तिढा आणखीच वाढलाय. खरं तर 15 राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशात धोबी समाज हा SC प्रवर्गात आहे. याचाच दाखला देत धोबी समाजाकडून SC आरक्षणाची मागणी केली जातेय.. मात्र कोणत्या राज्यात धोबी समाज SC प्रवर्गात आहे? पाहूयात...

कोणत्या राज्यात धोबी समाज SC प्रवर्गात

आंध्र प्रदेश

बिहार

आसाम

हिमाचल प्रदेश

झारखंड

मध्य प्रदेश

मेघालय

ओडिशा

राजस्थान

त्रिपुरा

उत्तर प्रदेश

पश्चिम बंगाल

मिझोराम

उत्तराखंड

दिल्ली

तर दुसरीकडे नाभिक समाजही 1985 पासून आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांचा दाखला देत SC आरक्षणाची मागणी केली जातेय.. मात्र या वादावर अखेर सरकारने मौन सोडत केंद्राकडे बोट दाखवलंय..

खरंतर महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात 374 जाती आहेत.. त्यात नाभिक आणि धोबी जातींचाही समावेश होतो..आता या जाती स्वतःला मागास घोषित करावं, यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत..राज्यातील प्रत्येक जात स्वतःला मागास सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र राज्यात दिसू लागलं आहे,यामागे आवाक्याबाहेर चाललेलं शिक्षण आणि सरकारी नोकरी हे कारण असल्याचं समोर आलंय..

वेगवेगळ्या जाती अशाप्रकारे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या तर राज्याची सामाजिक वीण उसवल्याशिवाय राहणार नाही. आणि ती कायम ठेवायची असेल तर सरकारने योग्य तोडगा काढायला हवा.. नाहीतर महाराष्ट्राची अधोगती ठरलेलीच.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

Fact Check : पोस्टाकडून पती-पत्नीला दरमहा 36 हजार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा स्पेशल रिपोर्ट

Pune Shocking : सासूपासून वेगळं राहुयात, बायकोचा लग्नानंतर हट्ट; नवऱ्याने कंटाळून आयुष्य संपवलं, पुण्यातील घटना

Crime: भयंकर! अंघोळ करणाऱ्या बायकोवर चाकूने सपासप वार, जीव घेतल्यानंतर तरुणाने फेसबुकवर लाईव्ह केलं अन्...

SCROLL FOR NEXT