Delimitation Bill: Will Uddhav Thackeray Faction Support It? Girish Mahajan's Big Claim saam tv
महाराष्ट्र

ठाकरे गटही डिलिमिटेशनला पाठिंबा देणार? गिरीश महाजनांच्या दाव्याने इंडिया आघाडीत खळबळ

Thackeray Group Support For delimitation : डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीत राजकीय मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटानंतर उद्धव ठाकरे यांचा गटही या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलाय.

Bharat Jadhav

लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या म्हणजेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापलंय. या विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसतंय. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनं आधीच डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय. त्यावरून इंडिया आघाडीचे नेत्याकडून शरद पवार गटावर टीका केली जातेय. परंतु आता हाती आलेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीला आखणी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाला ठाकरे गटही पाठिंबा देऊ शकतो असा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय.

राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. डिलिमिटेशनबाबतचे विचार पटले, तर ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देऊ शकते. मात्र, आजच याबाबत काही सांगता येणार नाही, असं सूचक विधान महाजन यांनी केलंय. डिलिमिटेशन झालं पाहिजे, ही सर्वांची मागणी असल्याचं गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय. खासदारांची संख्या वाढली पाहिजे, असं सांगताना सध्याच्या संख्याबळामुळे खासदारांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, त्यामुळे हे विधेयक पारित झालं पाहिजे, असंही महाजन म्हणालेत.

त्यावेळी महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरेही या विधेयकाला पाठिंबा देतील, असा दावा केलाय. ठाकरे गटाच्या शिवसेनेला डिलिमिटेशनबाबतचे विचार पटले, तर त्यांनी पाठिंबा दिल्यास त्याचं स्वागतच असेल, असं महाजन म्हणाले.

'काँग्रेस एकाकी पडली, उबाठा काँग्रेसच्या मागे फरफटत चालले'

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून बोलताना गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही टीका केली. काँग्रेस आता एकाकी पडलीय, तर ठाकरे गट काँग्रेसच्या मागे फरफटत जातेय, अशा टीकाही त्यांनी केली. काँग्रेसची आयडियॉलॉजी संपली असून ते तोंडात येईल ते बोलतात. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर विरोधकांची भूमिका काय आहे, यावरूनही महाजन यांनी प्रश्न उपस्थित केले.

यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्यावर न बोललेलं बरं, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. शरद पवार गटातील खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांनी शरद पवार गटावर टीका केली होती. यापुढे शरद पवार गटाच्या विरोधात निवडणूक लढवू. एकालाही विजयी होऊ देणार नाही, असा दावा केला.

त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांची बरोबरी होऊ शकत नाही, असं महाजन म्हणाले. आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेलेत. उल्लेख करत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ताकद दाखवून द्या, असं आव्हानही त्यांनी दिलं. संजय राऊत यांच्या भाषेबाबत टीका करताना ते शेलक्या भाषेत बोलतात, असं महाजन म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना आवरण्याचा सल्लाही दिला. संजय राऊत यांच्या विधानांमुळे शिवसेना संपविण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : डिलिमिटेशनवर काँग्रेसची भूमिका काय? थोड्याच वेळात पत्रकार परिषद

प्लेटलेट्स कमी झाल्यावर काय काळजी घ्यावी? जाणून घ्या आहार आणि महत्त्वाची माहिती

Dhule : धक्कादायक! हॉटेलच्या परिसरात आढळला मृतदेह, धुळ्यात त्या रात्री नेमकं काय घडलं?

चालकाला डुलकी लागली अन् कार थेट दरीत कोसळली; 6 महिलांसह 7 जणांचा मृत्यू

Chanakya Niti: पगारापासून बँक बॅलन्सपर्यंत...; 'या' 5 गोष्टी मरेपर्यंत कोणाला सांगू नका

SCROLL FOR NEXT