Ram Niwas Goel yandex
महाराष्ट्र

Delhi Politics: दिल्ली विधानसभा अध्यक्षांनी निवडणुकीच्या राजकारणातून केली निवृत्तीची घोषणा, पक्षासाठी करणार काम

Delhi Assembly News: आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना राम निवास गोयल यांनी पत्र लिहिले. दिल्ली विधानसभा अध्यक्षांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

Dhanshri Shintre

दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आणि आपचे आमदार राम निवास गोयल यांनी गुरुवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून म्हटले आहे की, निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे पत्रात सांगतानाच सर्वपक्षीय आमदारांनी दिलेल्या सन्माबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. वयामुळे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहायचे असले तरी पक्षाची सेवा करत राहणार असल्याचे ते म्हणाले.

केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात राम निवास गोयल यांनी लिहिले की, 'मी तुम्हाला नम्रपणे कळवू इच्छितो की, गेल्या 10 वर्षांपासून मी शाहदरा विधानसभेचे आमदार आणि अध्यक्ष म्हणून माझे कर्तव्य कुशलतेने पार पाडले आहे. तुम्ही मला नेहमीच खूप आदर दिला आहे ज्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. पक्षाने आणि सर्व आमदारांनीही मला खूप आदर दिला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पुढे त्यांनी लिहिले की, माझ्या वयामुळे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहायचे आहे. मी तुम्हाला खात्री देतो की मी आम आदमी पक्षाची पूर्ण तन, मन आणि धनाने सेवा करत राहीन. तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी द्याल ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन.

त्यांच्या पत्राला उत्तर देताना केजरीवाल यांनी लिहिले की, 'रामनिवास गोयल जी यांचा निवडणुकीच्या राजकारणातून दूर होण्याचा निर्णय हा आपल्या सर्वांसाठी भावनिक क्षण आहे. गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे सभागृहाच्या आत आणि बाहेर योग्य दिशा दाखवली आहे. त्यांचे वाढते वय आणि तब्येत यामुळे त्यांनी अलीकडेच निवडणुकीच्या राजकारणातून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. गोयल साहेब आमच्या कुटुंबाचे पालक होते, आहेत आणि राहतील. भविष्यातही पक्षाला त्यांच्या अनुभवाची आणि सेवांची गरज भासणार आहे.

रामनिवास गोयल हे प्रदीर्घ काळापासून राजकारणात आहेत. 1993 मध्ये ते शाहदरा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. पुढे आम आदमी पार्टी अस्तित्वात आल्यावर ते त्यात सामील झाले. यानंतर, गेल्या दोन निवडणुकांमध्ये ते सलग विजयी झाले आणि नंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT