Sanjay Raut On Delhi Saam Tv News
महाराष्ट्र

Sanjay Raut on Delhi Elections: दिल्ली निवडणुकीत 'महाराष्ट्र पॅटर्न'? संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Delhi Assembly Election Results 2025: निवडणूक निकालाच्या पाश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Bhagyashree Kamble

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये काटे की टक्कर झाली. तिहेरी लढतीत आता कोण बाजी मारणार? दिल्ली कुणाची होणार? हे काही तासात स्पष्ट होईल. सुरूवातीच्या कलांनुसार दिल्लीत भाजपचं कमळ फुलताना दिसलं. आतापर्यंत सत्ताधारी आप पक्षाला कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेसची अतिशय दारूण अवस्था आहे.

निवडणूक निकालाच्या पाश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झालं असतं तर, ही परिस्थिती झाली नसती, पहिल्या तासाभरातच भाजपचा पराभव झाला असता, असं म्हणत त्यांनी काँग्रेसलाही कानपिचक्या दिल्या आहेत.

संजय राऊतांचा हल्लाबोल

'दिल्लीत काल राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली. त्यातच सांगितलं की दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आलं आहे. ज्या प्रमाणे राज्यात घृणास्पद कृत्य झाले, तेच दिल्लीत दिसत आहे. राज्यात जो प्रौढांचा आकडा दिलाय त्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे. प्रत्येक मतदारसंघात १५ ते २० हजार मते वाढवली गेली आहेत. यातील काही मते जाणार कुठे तर, ही मते बिहार आणि दिल्लीत वळवली आहेत.

१० वर्षांपासून मोदी दिल्लीत होते. मी असताना दिल्ली जिकंली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे दिल्लीत विजय मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता', असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झालं असतं तर..

'काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झालं असतं तर, आता चित्र वेगळं असतं. भाजपला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेस लढत आहेत. पण ही लढाई ते वेगळे लढत आहेत. वेगळे झाले नसते तर, तासाभरातच भाजपचा पराभव झाला असता', असा राऊत म्हणाले.

केजरीवाल यांना काम करू दिलं नाही..

'५ वर्ष केजरीवाल यांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हातात ताकद दिली होती. सर्व प्रमुख नेत्यांना तुरूंगात टाकलं होतं. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल, हाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात आला. दिल्लीत झालं आता बिहारमध्येही दिसत आहे', असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Maharashtra Live News Update: वसुबारसच्या निमित्ताने रायगडमध्ये गाय आणि वासराच्या पुजनाला माहिलांची गर्दी

SCROLL FOR NEXT