deepak kesarkar warns sangeli navodaya vidyalaya administration  saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg : नवोदय विद्यालय विषबाधा घटनेची चाैकशी हाेणार, दाेषींवर कारवाईचे मंत्री केसरकरांचे निर्देश

Navodaya Vidyalaya Marathi News : नवाेद्य विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

सावंतवाडी (sawantwadi) तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयास (navodaya vidyalaya sangeli) आज (शनिवार) शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (deepak kesarkar) यांनी भेट देत विद्यालय प्रशासनास कडक शब्दात सुनावले. विद्यालयाचा कारभार मनमानी पद्धतीने हाेणार असेल तर ताे चालू देणार नाही असे केसरकरांनी स्पष्ट केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल 133 विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. 8) अन्नातून विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना उपचारार्थ सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.

आज (शनिवार) शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जवाहर नवोदय विद्यालयास भेट देत, विद्यालयाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री दिपक केसरकर यांनी प्राचार्यांची झाडा झडती घेतली. प्रशासनास देखील चांगलेच धारेवर धरले.

केसरकर म्हणाले अशा पद्धतीने तुम्ही मनमानी वागत असाल तर तुम्हांला तत्काळ निलंबित करणार. या घटनेचा चौकशी अहवाल घेवून तत्काळ दाेषींना निलंबित करण्याचे आदेश दिपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांनी पत्र लिहून मदतीची मागणी करणं अनपेक्षित; रविंद्र चव्हाणांचा टोला|VIDEO

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

SCROLL FOR NEXT