पाळण्याचा झोका ठरला तिच्यासाठी मृत्यूचा ठोका; अकोल्यातील दुर्देवी घटना Saam TV
महाराष्ट्र

पाळण्याचा झोका ठरला तिच्यासाठी मृत्यूचा ठोका; अकोल्यातील दुर्देवी घटना

वडील बाहेरगावी ड्यूटीवर गेले होते. त्यामूळे तीच्या जवळ कोणीही नव्हते. ती एकटीच पाळण्यावर होती.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : एका २१ वर्षीय तरुणीचा घरी झोका घेत असताना पाळण्याच्या दोरीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा येथे घडली. या घटनेमुळे संपुर्ण रिधोरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कल्याणी दिपक पोटे असे मृतक तरुणीचे नाव असून ती डिएड चे शिक्षण घेत आहे. प्राप्त माहितीनुसार, मृत कल्याणी हि सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातील पाळण्यावर बसून झोके घेत होती, तर तीची आई घराच्या कामात होती. वडील बाहेरगावी ड्यूटीवर गेले होते. त्यामूळे तीच्या जवळ कोणीही नव्हते. ती एकटीच पाळण्यावर होती.

पाळण्याच्या दोरीवर उशी टाकून ती बसलेली होती. अचानक उशी सरकल्याने ती खाली कोसळून बेडच्या काठावर उपडी पडली. व दोरी तीच्या गळ्याभोवती अडकली. तीच्या गळ्याला बेडचा जबर मार लागला. काही वेळ ती तशीच पडून होती. काही वेळा नंतर तीची आई वरून खाली आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. व तीच्या आईने किंचाळी फोडली. त्यामुळे नागरीकांनी मृत कल्याणीला सर्वोपचारमध्ये तातडीने हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार -

कल्याणी ही परीवारासह सर्वांचीच आवडती होती. तिचे पार्थिव आणल्यानंतर सर्वच हळहळले. लेकीच्या मृत्यूने तिच्या आई-वडीलांवर आभाळ कोसळले असून त्या दोघांचीही प्रकृती बिघडली. अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत कल्याणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव हळहळे होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT