भारतीय क्रिक्रेटला मागच्या काही काळापासून ग्रहण लागले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. त्यातच आता गांगुलीने एक नवीन विधान केले आहे. सौरव गांगुली यांनी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीबद्दल म्हटले आहे की, त्याची वृत्ती चांगली आहे, पण तो खूप भांडतो. अलीकडेच विराट कोहलीने सौरव गांगुलीच्या टी-20 कर्णधारपदावर केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू आहे. त्यानंतर कोहलीच्या वक्तव्यानंतर गांगुलीने बीसीसीआय (BCCI) हे प्रकरण हाताळेल असं म्हटलं होतं, मात्र आता पहिल्यांदाच विराट कोहलीबाबत असं वक्तव्य आलं आहे.
गुरुग्राममधील एका कार्यक्रमादरम्यान गांगुलीला विचारण्यात आले की, त्याला कोणत्या खेळाडूची वृत्ती आवडते. यावर माजी कर्णधार म्हणाला की मला विराट कोहलीची (Virat Kohli) वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो. सौरव गांगुलीलाही (Saurav Ganguly) विचारण्यात आले की, तो जीवनातील चिंतांवर कसा मात करतो. यावर गांगुलीने मजेशीर उत्तर दिले आणि म्हणाला आयुष्यात कोणतीही चिंता नाही. फक्त पत्नी आणि मैत्रीण चिंता देते.
विराट कोहलीने T20 विश्वचषकानंतर भारतीय T20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि त्यानंतर रोहित शर्माकडे T20 संघाची कमान सोपवण्यात आली होती. विराटने एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार राहणार असल्याचे सांगितले होते, परंतु ज्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ जाहीर झाला, त्याच दिवशी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहितकडे कर्णधारपद दिले.
यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, मी कोहलीला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते तसेच वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याआधी त्याच्याबद्दल बोलले जात होते. त्याचवेळी कोहलीने सांगितले की, त्याला बीसीसीआयकडून कोणीही टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नये, असे सांगितले होते, तसेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या केवळ दीड तास आधी त्याला फोनवर याबद्दल सांगण्यात आले होते. तो ठीक आहे म्हणाले. कोहलीच्या या विधानानंतर बराच गदारोळ झाला आणि बीसीसीआयने याप्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.