Hinganghat News Saam Tv News
महाराष्ट्र

Crime News: क्रूरतेचा कहर! आईने नवजात अर्भकाला स्वच्छतागृहात फेकलं, परिसरात खळबळ

Dead Infant Hinganghat Bus Stand: एका महिलेला कचराकुंडीत नवजात मृत पुरूष जातीचे अर्भक आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे करीत आहेत.

Bhagyashree Kamble

वर्ध्यातील हिंगणघाटात एक धक्कादायक घटना घडली आहे. बस स्थानकातील महिला स्वच्छतागृहात मृत पुरूष जातीचे अर्भक आढळले आहे. एका महिलेला कचराकुंडीत नवजात मृत पुरूषाचे अर्भक आढळल्यानंतर तिनं थेट पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हिंगणघाट येथील बसस्थानकातील महिला स्वच्छतागृहात मृत पुरुष जातीचे अर्भक आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अर्भक एका महिलेला स्वच्छतागृहात आढळले आहे. समुद्रपूर तालुक्यातील वाशी येथील गीता मारोती महाकाळ ही महिला बसस्थानकावर उभी होती. त्या महिलेला कोरा येथे जायचे होते.

गीता बसस्थानकाजवळील स्वच्छतागृहात गेली होती. स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यांना स्वच्छतागृहात पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक कचराकुंडीत नवजात बाळाचे अर्भक उघड्या स्थितीत दिसून आले. महिलेने चौकीदाराला या घटनेची माहिती दिली.

याबाबत तत्काळ बसस्थानक प्रशासनाला कळविण्यात आले. प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांनी पथकासह घटनास्थळ गाठत तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT