BJP CM Meeting Delhi:  Saamtv
महाराष्ट्र

BJP CM Meeting Delhi: दिल्ली दरबारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मान! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत थेट पहिल्या रांगेत स्थान; फोटोची राजकीय वर्तुळात चर्चा

BJP CM Meeting Delhi: भारतीय जनता पक्षाने भाजपशाशित राज्यातील मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपची सत्ता असलेल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.

Gangappa Pujari

गणेश कवाडे| ता. २८ जुलै २०२४

लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त करण्याची मागणी केली होती. लोकसभेत समाधानकारक यश न मिळाल्याने ते दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या तसेच पक्षश्रेष्ठी फडणवीसांवर नाराज असल्याच्याही वावड्या विरोधकांनी उठवल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील स्थान कायम असल्याची प्रचिती देणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाने भाजपशाशित राज्यातील मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भाजपची सत्ता असलेल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीनंतर सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबत फोटोसेशन केले. विशेष म्हणजे यामध्ये उपमुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांना मानाचे स्थान देण्यात आले. फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबत पहिल्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याने फक्त सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. तसेच पक्षाचा प्रोटोकॉल तोडून फडणवीस यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

SCROLL FOR NEXT