Maharashtra Governor : मोठी बातमी! सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार

Maharashtra New Governor : महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मोठी बातमी! सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार
Maharashtra New GovernorSaam TV
Published On

महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकामध्ये एकूण 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याचं समजतंय. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असंही सांगण्यात आलंय.

मोठी बातमी! सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार
Niti Aayog Meeting: शेतकरी, रोजगार, पर्यटन; नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले हे मुद्दे

महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल

महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी (Maharashtra New Governor) सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करण्यात आली आहे. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. आता त्यांची महाराष्ट्राच्या राजपालपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर झारखंडमध्ये राज्यपाल पदाचा पदभार संतोषकुमार गंगवार सांभाळणार आहेत.

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत?

६७ वर्षीय सी.पी राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन हे दोन वेळा निवडून गेले. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती.

हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हरिभाऊ बागडे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचा पदभार स्वीकारला होता.

कोणकोणत्या राज्याला मिळाले नवीन राज्यपाल?

  • सी. पी. राधाकृष्णन - महाराष्ट्र

  • हरिभाऊ किसनराव बागडे - राजस्थान

  • संतोषकुमार गंगवार - झारखंड

  • रमण डेका - छत्तीसगड

  • सी. एच. विजयशंकर - मेघालय

  • ओमप्रकाश माथूर - सिक्किम

  • गुलाबचंद कटारिया - पंजाब, चंडीगड

  • लक्ष्मण प्रसाद आचार्य - आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)

  • जिष्णू देव वर्मा - तेलंगण

  • के. कैलाशनाथन - पुदुच्चेरी (उप राज्यपाल)

मोठी बातमी! सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार
VIDEO: विधानसभेआधी दादांना मोठा धक्का, बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com