VIDEO: विधानसभेआधी दादांना मोठा धक्का, बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

Babajani Durrani Joined Sharad Pawar Group: शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का दिलाय. अजित पवारांच्या पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलाय..शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये संवाद मेळाव्यात पक्ष प्रवेश झाला. दुर्राणींनी पक्ष का सोडला काय नेमकं घडलं, ते जाणून घेऊ...
विधानसभेआधी दादांना मोठा धक्का, बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
Babajani Durrani Joined Sharad Pawar GroupSaam Tv
Published On

परभणीतील पाथरीचे राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत दादांना धक्का दिलाय. मात्र यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दुर्राणींनी खास अंदाजात प्रतिक्रिया दिलीये.

तर प्रफुल्ल पटेलांनी दुर्राणींच्या नाराजीचं कारण सांगितलं. तिकीट न दिल्यानं दुर्राणींनी पक्ष सोडला, असं ते म्हणाले. यावर बाबाजानी दुर्राणी यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटलं की, ''कोणतीही मजबुरी नाही, साहेबांसोबत मी आधीपासूनच आहे.''

विधानसभेआधी दादांना मोठा धक्का, बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
Shivneri Fort News : मोठी बातमी! किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

कोण आहेत बाबाजानी दुर्राणी?

बाबाजानी दुर्राणी 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. 2012 आणि 2018 मध्ये शरद पवारांकडून विधान परिषदेवर आमदारकी त्यांना देण्यात आली. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दुर्राणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाथरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. तिकीट वाटपातल्या नाराजीनंतर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतेल आहेत. लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बरीच चलबिचल पाहायला मिळाली.आत्तापर्यंत कोणीकोणी दादांची साथ सोडली ते जाणून घेऊ...

दादांच्या राष्ट्रवादीला गळती

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंचाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर पिंपरी-चिंचवडचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोरांची सोडचिठ्ठी दिली.

विधानसभेआधी दादांना मोठा धक्का, बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
Pune Railway station : पुणे रेल्वे स्टेशनचं १०० व्या वर्षात पदार्पण, स्थानकाच्या कामाला किती खर्च आला? जाणून घ्या

ऐन विधानसभा निवडणुकांआधी अजित दादांना धक्क्यावर धक्के बसतायत...एकीकडे राष्ट्रवादीला गळती लागलीये तर दुसरीकडे महायुतीच्या सुमार कामगिरीचं खापरही दादांवर फोडलं जातंय. त्यामुळे अजित दादांसाठी विधानसभेची वाट दिवसेंदिवस अधिक खडतर होतेय. सगळ्याचं आघाड्यावर दादांची कसोटी लागणार एवढं नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com