Shivneri Fort News : मोठी बातमी! किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Shivneri Fort update : किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा बुरुज कोसळल्याची घटना घडली आहे. यानंतर पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जुन्नर वनविभागाने आवाहन केलं आहे.
मोठी बातमी! किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला, सुदैवाना मोठी दुर्घटना टळली
Shivneri Fort News Saam tv
Published On

पुणे : पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळल्याची घटना घडली आहे. त्यानंतर किल्लाच्या तटबंदीचा बुरुजही कोसळला आहे. यानंतर शिवनेरीवर जाताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जुन्नर वनविभागाने आवाहन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील किल्ले शिवनेरीच्या गणेश दरवाजाच्या वरील बाजुचा कडा खाली कोसळल्याने भातखळा तटबंदीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या गडकिल्ल्यांवर ३१ जुलैपर्यंत जमावबंदी लागू आहे. तरीही पर्यटक किल्ले शिवनेरीवर येत आहे. त्यामुळे किल्ल्यावर कडा कोसळण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जुन्नर वनविभागाने केले आहे

मोठी बातमी! किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला, सुदैवाना मोठी दुर्घटना टळली
Pune Railway station : पुणे रेल्वे स्टेशनचं १०० व्या वर्षात पदार्पण, स्थानकाच्या कामाला किती खर्च आला? जाणून घ्या

पन्हाळगडाच्या पूर्व तटबंदीतील दगडी शिळा कोसळली

दरम्यान, पन्हाळगडाच्या पूर्व तटबंदीतील दगडी शिळा आज शनिवारी कोसळल्याची घटना घडली आहे. पन्हाळगडावरील नायकीनीचा सज्जा या ऐतिहासिक इमारतीच्या जवळील तटबंदीतील दगडी शिळाच्या समूहातील एक शिळा कोसळली.

तटबंदीतील अंदाजे दहा ते बारा फूट उंचीची शिळा कोसळली आहे. या तटबंदीच्या खाली बुधवार पेठ, मंगळवार पेठ, आणि नेबापूर अशी गाव आहेत. रात्री तटबंदीतून मोठा आवाज आला. त्या आवाजाने मंगळावरपेठेतील लोक घरा बाहेर आले. पण कोसळणाऱ्या पावसामुळे आणि काळोखामुळे काही दिसत नव्हते. त्यामुळे नेमके काय झाले आहे समजत नसल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.

मोठी बातमी! किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला, सुदैवाना मोठी दुर्घटना टळली
Pune Crime News: 'मी IAS अधिकारी, नादाला लागू नको', धमकी देत पैसे उकळले, पुण्यातील तरुणीचा प्रताप, अवैध सावकारीचा गुन्हा दाखल

स्थानिक नागरिकांनी रात्री बॅटरीच्या प्रकाशझोतात तटबंदीत पाहिले. त्यानंतर तटबंदीतून दगडी शिळा कोसळल्याचे दिसले. पण मुसळधार पाऊस व दाट धुक्यामुळे भूस्खलनाची तीव्रता समाजाण्यास कठीण जात होते. या भागात मागील चार-पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून पन्हाळगाडाला भुस्खलनाच्या घटना घडत आहे. यामुळे दोनवेळा मुख्य रस्ता बंद झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com