पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान पालकमंत्री अजित पवार यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, लष्काराचे जवान आणि एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मात्र सर्व पर्यटनस्थळे ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहेत, त्यामुळे पर्यटकांनी धबधबे किंवा धरणांच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सगळ्या धरणाचे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितलं आहे. पाऊस आटोक्यात आला आहे पण नागरिकांना विनंती आहे घाबरु नका. पुण्यात सिंहगड रोड भागात लष्कर तैनात करण्यात आलं आहे, एनडीआरएफ चे ४० जवान तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री यांचे सुद्धा या परिस्थितीवर लक्ष आहे. मुळशी धरण सुद्धा भरलं आहे तिथे वीज निर्मितीसाठी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
सिंहगड रोड भागात लष्कराची एक तुकडी आणि एक एनडीआर एफचं टीम तैनात आहे. धबधबे पाहण्यासाठी लोकांना उत्साह असतो पण त्यांना आवाहन आहे की २ दिवस तिथे जाऊ नका. ४८ तासांसाठी धबधबे बंद करण्यात आले आहेत. लवासामध्ये बंगल्यांवर मलबा पडला आहे. तिथले रस्ते वाहून गेले आहेत. तिकडे पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. जर कोणी अडकले असेल तर आमचे प्रयत्न सुरू असल्यांचं अजित पवारांनी सांगितलं.
अनधिकृत वीज घेतली होती असा अंदाज आहे. पुण्यातील ३ जणांचा डेक्कन भागात त्यांचा मृत्यू झाला आहे. जे जखमी झाले आहेत त्याचा खर्च शासन आणि महापालिका करणार आहे. नैसर्गिक संकट आलं की विरोधक काय आरोप करतात त्यावर लक्ष द्यायचं नसतं.कोणी काही बोलले असेल तरी सुद्धा मला काही बोलायचं नाही, यात मला राजकारण करायचं नाही. ज्या सोसायटी टाक्यांमध्ये पाणी शिरले आहे त्यांना टँकर ने पाणी दिलं जाईल. वारजे भागात मृत्यूमुखी म्हशींचा पंजनामा करण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.