love affaire crime news Saam Tv
महाराष्ट्र

क्रूरतेचा कळस! प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केला जन्मदात्या आईचा खून, काय आहे प्रकरण?

उर्मिला आणि रूपेश यांचे प्रेमसंबंध तिच्या आईला मान्य नव्हते, कारण....

साम टिव्ही ब्युरो

अहेरी : येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. प्रियकराच्या मदतीने मुलीने जन्मदात्या आईची हत्या (love Affaire Crime) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही भयंकर घटना अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात आज शुक्रवारी घडली. निर्मला (४९) असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी उर्मिला आणि रूपेशला (Police) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पोलीस अधिकारी,कर्मचारी गस्त घालत असताना आरोपी ऊर्मिला व तिचा प्रियकर रूपेश रस्त्याने येजा करताना दिसले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी उर्मिला व रूपेशला उर्मिलाच्या घरी नेले. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता उर्मिलाची आई निर्मला मृतावस्थेत आढळून आली.त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर पोलिसांनी उर्मिला व तिचा प्रियकर रूपेशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. दोघांनीही सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. उर्मिलाचे वडील चंद्रकांत पोलिस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. त्यानंतर उर्मिलाचे पालनपोषण तिच्या आईने केलं. परंतु, उर्मिला आणि रूपेश यांचे प्रेमसंबंध तिच्या आईला मान्य नव्हते. तिने उर्मिलाला याबद्दल अनेकदा खडसावले आणि विरोध केला. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या आईची हत्या उर्मिलाने प्रियकर रूपेशच्या मदतीने केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT