Raju Srivastava | राजू श्रीवास्तवसाठी चाहते प्रार्थना करत असतानाच गीतकाराची पोस्ट होतेय व्हायरल

राजू श्रीवास्तवची प्रकृती काल आणखी खालावल्याचे वृत्त होते. त्यानंतर चाहत्यांच्या चिंतेत आणखी भर पडली. आता राजू श्रीवास्तवसाठी गीतकारानं शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.
Raju Srivastava Health Update/rajusrivastavaofficial/instagram
Raju Srivastava Health Update/rajusrivastavaofficial/instagramSAAM TV
Published On

मुंबई: कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तवची(Raju Srivastava) प्रकृती चिंताजनक आहे. त्याचे देशभरातील चाहते राजू बरा व्हावा म्हणून हात जोडून प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तवची प्रकृती काल आणखी खालावल्याचे वृत्त होते. त्यानंतर चाहत्यांच्या चिंतेत आणखी भर पडली. आता राजू श्रीवास्तवसाठी गीतकारानं शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

Raju Srivastava Health Update/rajusrivastavaofficial/instagram
Yuzvendra Chahal-Dhanashree | युजवेंद्र चहलसोबत बिनसल्याच्या वृत्तावर धनश्रीनं मौन सोडलं, म्हणाली...

राजू श्रीवास्तवची प्रकृती अचानक खालावली. जीममध्ये वर्कआऊट करताना तो खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. राजूला तातडीने एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. त्याच्या शरीराची हालचाल आधीपेक्षा अधिक होत असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले होते. मात्र, काल अचानक त्याची प्रकृती ढासळली. डॉक्टरांची टीम राजूच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बॉलिवूड गीतकार मनोज मुंतशिर(Manoj Muntashir) यांनीही राजू श्रीवास्तव याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

Raju Srivastava Health Update/rajusrivastavaofficial/instagram
Jacqueline Fernandez Case : जॅकलीन ईडीच्या बेडीत अडकली?; वकिलानं काय सांगितलं? वाचा

प्रसिद्ध विनोदवीर राजू श्रीवास्तव याच्या प्रकृतीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रार्थना केली जात आहे. आपल्या आवडत्या विनोदवीराच्या प्रकृतीबद्दल चाहतेही चिंतेत आहेत. दरम्यान, मनोज मुंतशिर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर राजू श्रीवास्तवसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. राजू श्रीवास्तव याचा फोटो शेअर करत त्यांनी 'राजू भाई, हिंमत हरू नका, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आहोत,' असे म्हटले आहे. ही त्यांची पोस्ट राजू श्रीवास्तवच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरूनही शेअर करण्यात आली आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव याची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्याच्या मेंदूला सूज असल्याचे सांगण्यात येत असून, डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच राजूचा रक्तदाब कमी-अधिक होत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव गेल्या नऊ दिवसांपासून शुद्धीवर आलेला नाही.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव हा योद्धा आहे. ते त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी परततील. ही लढाई ते नक्कीच जिंकतील. याशिवाय त्यांनी चाहत्यांना प्रार्थना करत राहा, असे आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com