jacqueline fernandez
jacqueline fernandez saam Tv

Jacqueline Fernandez Case : जॅकलीन ईडीच्या बेडीत अडकली?; वकिलानं काय सांगितलं? वाचा

बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीलंकन ​​ब्युटी जॅकलीन फर्नांडिस सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, काही काळापासून तिचे नाव सुकेश चंद्रशेखर मनी लॉंडरिंग प्रकरणाशी जोडले जात होते.
Published on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीलंकन ​​ब्युटी जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) सध्या खूप चर्चेत आहे. वास्तविक, काही काळापासून तिचे नाव सुकेश चंद्रशेखर मनी लॉंडरिंग प्रकरणाशी जोडले जात होते. अशा परिस्थितीत जॅकलिनच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच जात आहेत. सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग(Money Laundering) प्रकरणात जॅकलीनचे नाव सातत्याने समोर येत आहे. आता या प्रकरणाशी संबंधित नवीन अपडेट समोर आली आहे. जॅकलीन फर्नांडिसचे वकील प्रशांत पाटील यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे.

jacqueline fernandez
Godavari : निशिकांतची आजही मला आठवण येते; व्हिडिओ शेअर करत जितेंद्र जोशी झाला भावुक

अभिनेत्री जॅकलीनचे वकील प्रशांत म्हणाले की, 'आतापर्यंत आम्हाला फक्त एवढीच माहिती मिळाली आहे की ईडीने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्याप यावर ईडीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. माझ्या क्लायंटला अद्याप अहवालाची कोणतीही प्रत मिळालेली नाही. फक्त मीडिया रिपोर्ट्समुळेच, तर जॅकलीनला या प्रकरणात आरोपी म्हणून संबोधले जात आहे आणि हे खूप दुःखदायक आहे'.

jacqueline fernandez
Dagdi Chawl 2 : डॅडी आणि शकीलच्या गॅंगवॉरमध्ये अडकणार का सूर्या?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला १० कोटींचे गिफ्ट दिले होते. यानंतर ईडीने अभिनेत्रीवर कारवाई केली. जॅकलीनने ईडीला सांगितले की, सुकेशने तिला दर आठवड्याला लिमिटेड एडिशन परफ्यूम दिले होते. याशिवाय नऊ लाख रुपयांच्या तीन मांजरी आणि ५२ लाख रुपयांचा एक अरबी घोडाही जॅकलीनला भेट म्हणून दिला होता. गुच्ची आणि चॅनेल डिझायनर बॅग, लुई व्हिटॉन शूज, दोन डायमंड कानातले, गुच्ची जिम वेअर, दोन ब्रेसलेटही सुकेशने भेट म्हणून दिले होते.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच ती साऊथ स्टार कीचा सुदीपसोबत 'विक्रांत रोना'मध्ये दिसली. त्याचबरोबर ती लवकरच अक्षय कुमारसोबत तिचा आगामी चित्रपट 'राम सेतू'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com