भयंकर! इन्स्टाग्राम मैत्रिणीचा लग्नासाठी थयथयाट, मुलाच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत आत्महत्येची धमकी

सोशल मीडियावरओळख झालेल्या एका तरुणीने लग्नासाठी मुलाच्या घरी जावून धिंगाणा घातला, कारण...
Love Affair latest news update
Love Affair latest news updatesaam tv
Published On

अहमदनगर : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर (Instagram) ओळख झालेल्या एका तरुणीने लग्नासाठी मुलाच्या घरी जावून धिंगाणा घातला. मुलाच्या आई-वडिलांना तरुणीने शिवीगाळ केली. तुमच्या मुलाचे माझ्याशी लग्न करून द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल, अशी धमकीही तरुणीने मुलाच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर संतापलेल्या तरुणीला मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी तरुणीच्या विरोधात (Police) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Love Affair latest news update
दुसऱ्याचे डिलीट मेसेजेस कसे वाचू शकता? WhatsApp च्या भन्नाट फिचरबद्दल जाणून घ्या सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आठ महिन्यापूर्वी तरुणाची आलमगिरी (भिंगार) येथील एका मुलीशी ओळख झाली. त्यानंतर तरुणाने मुलीला प्रेमदान चौकातील एका कॅफेमध्ये भेटण्यास बोलविले. त्यावेळी त्या मुलीने लग्न करण्याची मागणी तरुणाकडे केली. तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्यावर तरुणीने भिंगार पोलीस ठाणे आणि न्यायालयात अत्याचाराची तक्रार दाखल केली.

Love Affair latest news update
आम्ही ५० थराची सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

या प्रकरणामध्ये तरुणाचा जबाब नोंदविण्यात आलेला आहे. संबंधित तरुणीही गुरुवारी (ता.१८) दुपारी दोन वाजता कुणाल यांच्या घरी आली. तिने हातामध्ये ब्लेड आणले होते.माझे कुणाला बरोबर लग्न लावून द्या, नाहीतर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल,अशी धमकी तिने दिली. कुणाल यांच्या आईने तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता,तिने मारहाण केली तसेच वडिलांनाही शिवीगाळ केली. लग्न लावून न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी मुलीला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिच्याविरुद्ध घरात बेकायदेशीरपणे घुसणे,मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com