Cyclone Montha news :  Saam tv
महाराष्ट्र

Cyclone Montha Update : 'मोंथा' चक्रीवादळाचा तडाखा बसणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या

Cyclone Montha news : 'मोंथा' चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय.

Vishal Gangurde

मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर रेड अलर्ट

तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली

सागर आव्हाड, साम टीव्ही

मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे.

भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव वाढत आहे. हवामान खात्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांदरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, “मोंथा चक्रीवादळामुळे समुद्रात जोरदार वारे वाहत आहेत आणि त्याचा परिणाम किनारपट्टीवर होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, राज्य प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

मुख्य मुद्दे काय?

मोंथा चक्रीवादळाचा किनारपट्टीवर प्रभाव पाहायला मिळेल. तामिळनाडू, आंध्र, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय . पुढील 2–3 दिवस तीव्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात न जाण्याचा सल्ला मच्छीमारांना देण्यात आलाय. चक्रीवादळामुळे प्रशासन सतर्क झालं आहे.

समुद्रातील स्पोर्ट्स बंद, किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक सुद्धा बंद

पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये मोंथा चक्रीवादळ धडकलंय. कोकणातही सध्या समुद्रातील वातावरण बदललं आहे. यामुळे किनाऱ्यावर जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. यामुळे सकाळपासून किनारपट्टी भागातलं वातावरण ढगाळ झालंय. चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जोरदार वाऱ्यामुळे मच्छीमारी सध्या ठप्प झाली आहे. तसेच पर्यटनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाआधीच राज्यातला पहिलाच नगराध्यक्ष बिनविरोध, धुळे जिल्ह्यात भाजपचं खातं उघडलं

Shocking : मनोरंजन विश्वाला पुन्हा धक्का; तरुण अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

धक्कादायक! सख्ख्या मामानं भाचीला लोकलमधून ढकललं, ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात पडली

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांचा अर्ज वैद ठरला

Abdominal Symptoms: पोटदुखी अचानक वाढलीये? कॅन्सरचा असू शकतो धोका, वाचा तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT