

गडचिरोलीतील काँग्रेसने स्थानिक नेत्यांना प्रवेश देऊन निवडणुकीसाठी कंबर कसली
या प्रवेशामुळे शरद पवारांच्या गटाला बसला मोठा झटका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने वेळेत तयारी सुरु
काँग्रेसने विरोधकांसह सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोर्चेबांधणी
गणेश शिंगाडे, साम टीव्ही
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. गडचिरोलीतील नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष आणि इतर नेत्यांनी काँग्रेसनमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगराध्यक्षांनी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
गडचिरोलीत काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसने संघटनपातळीवर चांगलाच जोर लावला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात शरद पवार गटाच्या नेत्यांनी काँग्रेनमध्ये प्रवेश केला. गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच सुरेश पोरड्डीवार यांच्या पत्नी प्राचार्य कविता पोरड्डीवार यांनीही पक्षात प्रवेश केला.
या आधी त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठे नेते म्हणून ओळख आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने गडचिरोलीतील हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्यासोबत इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षला तेलमुले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे प्रदेशा हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, भाजप हे मित्र पक्षांना खाण्याकरिता आता निघालेली आहे.भाजपने एकत्रित शिवसेनेला धोका दिला होता. तसाच धोका येणाऱ्या काळात दोन्ही पक्षाला देईल. कोणतेही कायदे न वापरता केवळ सत्ता आणि सत्तेचा उमेदवार या गोष्टीत भाजपचं लक्ष आहे'.
मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य करताना सपकाळ पुढे म्हणाले, 'विविधतेत एकता, हीच भारताची विशेषता आहे.", असं संविधानात लिहिलं आहे.परंतु अनेक लोक जात, धर्म, पंथ, भाषा, वर्णलिंग आणि भौगोलिक प्रदेशानुसार राजकारण करत आलेले आहेत, भारत हा आपल्या सगळ्यांचा आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.