'साताऱ्यातील डॉक्टर महिलेचे आरोप मोघम, अत्याचाराचा पुरावा काय?' PSI बदनेच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला?

Satara doctor Case : साताऱ्यातील डॉक्टर महिलेचे आरोप मोघम असल्याचा युक्तिवाद बदनेच्या वकिलांनी केला. कोर्टात नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Satara doctor news
Satara doctor Case Saam tv
Published On
Summary

डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात आरोपी PSI गोपाळ बदनेला अटक

आरोपीला ५ दिवसांची म्हणजे ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये

डॉक्टर महिलेचे आरोप मोघम, पुरावा नाही, असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं

सातारा डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला दुपारी सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं. कोर्टाने आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी बदनेला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी आरोपी बदनेच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. 'पीडित महिलेचे आरोप मोघम असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

Satara doctor news
Satara Doctor Case : साताऱ्यात भाड्याच्या घरात राहणारी डॉक्टर महिला लॉजवर राहायला का गेली? धक्कादायक माहिती समोर

पोलीस उपनिरीक्षक बदने रात्री फटलणच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वत:हून हजर झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आज आरोपीला फलटणमध्ये न्यायालयात हजर केले. यावेळी आरोपीचे वकील राहुल धायगुडे यांनी कोर्टात युक्तिवाद केला की, 'आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद करताना मृत डॉक्टर तरुणीने तिच्यावर कुठे-कुठे कोण कोणत्या ठिकाणावर बलात्कार झाला हे नमूद केले नाही. हे आरोप पोलीस अधिकारी बदने आणि डॉक्टर तरुणीसोबत असणार्‍या वादातून मृत तरुणीने केले आहेत . मृत डॉक्टर महिलेचे आरोप मोघम आहेत, त्याला कोणताही पुरावा नाही'.

Satara doctor news
... LIC कडून अदानी समूहाला ३३००० कोटी? वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात खळबळजनक दावा, VIDEO

तर सरकारी वकीलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सांगत म्हटलं की, मरणारा व्यक्ती कधी खोटे बोलत नसतो असा युक्तिवाद केला. त्यामुळे यात पोलिसांना तपासासाठी वेळ मिळणे गरजेचे असल्याचे युक्तिवाद केला आहे.

Satara doctor news
Shocking : धक्कादायक! खेळताना छतावरून कोसळला; लोखंडी सळई थेट पोटातून आरपार, ५ वर्षीय मुलाची प्रकृती नाजूक

सातारा डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी

डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच एसआयटी स्थापन करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली. स्वतः डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विशेष मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com