Satara News : डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती, मृत्यूचं खरं कारण समोर, शेवटचा कॉल कोणाला केला?

Satara News update : डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती आलाय. या रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.
Satara News
Satara News update Saam tv
Published On
Summary

आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांच्या हाती

रिपोर्टनुसार मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे निष्पन्न झालंय

मृत्यूआधी डॉक्टर महिलेने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेलाही कॉल केला होता

पोलिसांना आता या प्रकरणात फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

Satara News : साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. लॉजवर जाऊन आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्टही पोलिसांच्या हाती आला आहे. या रिपोर्टमध्ये मृत डॉक्टरचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे उघड झालं आहे. तर डॉक्टर महिलने मृत्यूआधी आरोपी पोलीस निरीक्षक गोपाळ बदनेला देखील कॉल केल्याचे समोर आलं आहे.

साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्याआधी हातावर दोन आरोपींची नावे लिहिली होती. तिने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने ४ वेळा बलात्कार केल्याचे लिहिले होते. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक फरार झाला होता. दोन दिवसांनी स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत.

Satara News
Maharashtra Politics : निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र खळबळ उडवून देणाऱ्या प्रकरणातील मृत डॉक्टर महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट आज मंगळवारी पोलिसांच्या हाती आला. या मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात नाहीत. डॉक्टर महिलेचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे उघड झालं आहे. आरोपी प्रशांत बनकर, पीएसआय गोपाळ बदने आणि मृत डॉक्टरांचे सीडीआर पोलिसांच्या हाती आले आहेत.

मृत डॉक्टरने मृत्यूआधी शेवटचा कॉल कोणाला केला, याविषयी माहिती समोर आलेली नाही. परंतु आत्महत्येआधी डॉक्टर महिलेचे कॉल पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेसोबतही झाल्याचे तपास उघड झाले आहेत. मात्र, पोलीस उपनिरीक्षक बदने याने त्याचा फोन अद्याप पोलिसांना दिलेला नाही. आता त्याच्या फोनचा तपास सुरु आहे.

Satara News
Kalyan : 'एकच प्याला' पडला महागात; दारुच्या दुकानातील एक्सपायरी डेट संपलेली बिअर प्यायल्याने ग्राहकाची प्रकृती बिघडली

गोपाळ बदने याने केवळ मैत्रीशिवाय दुसरे कोणतंही नातं नसल्याचे पोलीस तपासात सांगितले. मृत डॉक्टरच्या हातावरील हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेन्सिक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com