Chhatrapati Sambhajinagar Accident
Chhatrapati Sambhajinagar Accident Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Accident News: कारने दुचाकीला १०० फूट फरपटत नेलं; तरुणाचा मृत्यू, घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. येथे एका कारने दुचाकीला तब्बल १०० फुटांपर्यंत फरपटत नेलं आहे. या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Accident News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, "वैजापूर शहरातील जीवनगंगा वसाहती सामोर नाशिक - छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महामार्गावर अपघाताची ही घटना घडली आहे. यामध्ये कारने दुचाकीला उडवत 100 फुटापर्यंत ओढत नेले.

या थरारक अपघातात दुचाकीस्वार हा जवळ पास 15 फूट हवेत फेकला गेला. दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. ही सगळी घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सुरेश चरवंडे असे या घटनेतील मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

समृध्दी महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात

आज समृद्धी महामार्गावर देखील पुन्हा एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात नेमका कसा झाला?

समृद्धी महामार्गावर कारचा समोरचा टायर फुटल्याने अपघात झाला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात वाशिम (Washim) जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लोकेशन १८७ वर झाला आहे. कारच्या समोरचा टायर फुटताच कार डिव्हायडरला धडकल्याने कारचे मागील टायर सुद्धा फुटले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

Vidula Chougule : तुला पाहून सूर्यफूलही लाजून कोमेजलं...

Hingoli Water Crisis | Saam Tv च्या बातमीमुळे काय झालं बघाच!

Sanjay Raut | "त्यांनाच शिंदे नको होते.." राऊतांनी नावं घेत सगळंच सांगितलं..

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

SCROLL FOR NEXT