साम टिव्ही ब्युरो
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये काल सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला.
भयंकर अपघातातील मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे.
अपघातातील जखमींची संख्या 900 हून अधिक आहे.
काल अपघातानंतर सुरु झालेलं बचावकार्य अद्यापही सुरु आहे.
जखमी प्रवाशांना सोरो सीएसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.